India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सटाणा तालुक्यात पुन्हा अवकाळी, गारपीट आणि वादळी वारा… घरे, शेती, जनावरांचे प्रचंड नुकसान..

India Darpan by India Darpan
May 24, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात बेमोसमी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने काल मंगळवार दि.२३ रोजी जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काल दुपारनंतर जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी भागात बेमोसमी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने शेतीपिकांचे १०० टक्के नुकसान झाले. अनेक ग्रामस्थांचे घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वीज महावितरणचे तब्बल ८० ते ९० खांब आणि ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाले. शेळ्या, गायी मृत्यूमुखी पडल्या असून, अनेक ठिकाणी शेतातील झाडेही उन्मळून पडले आहेत. तसेच, चाळीत कांदा भरत असताना उघड्यावर पडलेल्या कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जुनी शेमळी येथील प्रशांत बच्छाव यांच्या गोठ्याचे आणि डाळिंब बागेचे, भाऊसाहेब बच्छाव यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती खचल्या.

यावेळी जीवितहानी टळली मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुरतीराम शेलार यांच्या दीड एकर डाळिंबाचे नुकसान झाले असून रत्नाकर बच्छाव यांची कांदा चाळ उध्वस्त होऊन सर्व कांदे ओले झाले आहेत. राजेंद्र खैरणार यांची गाय मृत्यूमुखी पडली असून तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले. वसंत खैरणार यांची पाचटाची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नवी शेमळी येथील बाबुलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे दूरवर उडाले. तर जुनी व नवी शेमळी परिसरातील वीज वितरण कंपनीचे अनेक खांब जमीनीवर अक्षरशः वाकले आहेत.

संजय चव्हाण यांचा पाहणी दौरा
माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी आज सकाळी या भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांचे सांत्वन केले. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनास तात्काळ प्रस्ताव सादर करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे त्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या मदतीने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. यावेळी सरपंच कल्पना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, जनार्दन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल बच्छाव, भाऊसाहेब बच्छाव, टी.एन.वाघ, के.सी.वाघ आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बागलाणला भेट देऊन आठ दिवसात मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाकडून अद्यापही शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील बळीराजाचे होत्याचे नव्हते झाले असताना शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र शेतकर्‍यांची क्रूर थट्टा सुरू आहे. येत्या निवडणुकांमध्ये या सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवून देतील. एकवेळ विकासाची कामे बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना आधी मदत करा.

Satana Taluka Unseasonal Rain Hailstorm Crop Loss


Previous Post

एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री… जितेंद्र आव्हाडांनी सांगितला सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा निष्कर्ष (व्हिडिओ)

Next Post

पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पातळीवर काय आणि कसे प्रयत्न होत आहेत?

Next Post

पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पातळीवर काय आणि कसे प्रयत्न होत आहेत?

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group