ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत जो निकाल दिला आहे. त्यातून हे स्पष्ट होते की, एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण, विधानसभा अध्यक्षांनी एकनथ शिंदे यांची सभागृहाचे नेते म्हणून केलेली निवडच अवैध आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. यासंदर्भात आता राज्यभरामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल जाहीर केला. हा निकाल सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी काल ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात एक कार्यक्रम राबवण्यात आला या विषयीची माहिती आज माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुराव्यासहीत त्याचे विश्लेषण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यात आले.
आव्हाड यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षातील काही नेते सत्तासंघर्षाचा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे या संबंधीची माहिती लोकांना देण्यात आली त्यामुळे या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आव्हाड यांनी सांगितले. हा कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने आयोजित करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यासाठी जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
बघा, आव्हाड यांचा हा व्हिडिओ
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल जाहीर केला. हा निकाल सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी काल ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात एक कार्यक्रम राबवण्यात आला या विषयीची माहिती आज माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना दिली. सर्वोच्च… pic.twitter.com/tiM1R7YvaE
— NCP (@NCPspeaks) May 24, 2023
NCP Leader Jitendra Awhad on Eknath Shinde CM Post