India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सटाणा पंचायत समितीच्या वरिष्ठ लेखाधिकारीची पेन्शनधारक संघटनेच्या अध्यक्षांना अरेरावी

India Darpan by India Darpan
October 14, 2022
in Uncategorized
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचायत समितीचे अर्थ विभागाचे लेखापाल डी. सी. पाटील यांच्या मनमानी विरोधात कारवाई करण्याची मागणी तालुका पेन्शनधारक संघटनेने गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही देण्यात आली आहे.

बागलाण पंचायत समितीच्या अर्थ विभागात गेली अनेक वर्षे लेखापाल म्हणून कार्यरत असलेले डी. सी. पाटील यांच्या मनमानी विरोधात पेन्शन धारक संघटनेने आक्रमक होत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या लेखापालच्या मनमानी विरोधात आता सर्वच स्तरातून चर्चा होत आहे. तालुका पेन्शनधारक संघटनेचे अध्यक्ष असलेले बाजीराव पाटील हे जिल्हा परिषदेकडून आलेले पेन्शन बाबत पंचायत असलेली माहिती विचारण्यासाठी अर्थ विभागाच्या कार्यलायत गेले असता लेखाधिकारी असलेले डी. सी. पाटील यांनी अध्यक्ष बाजीराव पाटील यांना अपमानस्पद वागणूक देत अरेरावी केल्याने संघटनेने नाराजी व्यक्त करीत निवेदन दिले आहे.

दोन तीन वर्षे पूर्वी आपल्याच वरिष्ठांसोबत कार्यलायतच मारहाण करण्याचा प्रकार पाटील यांच्या बाबत झालेला असतांना त्यावेळी कुठलीही कार्यवाही प्रशासनाने न केल्याने गेली अनेक वर्षे एकाच कार्यलायत स्थान मांडून बसलेल्या पाटील यांच्या विरोधात आता पेन्शन धारक संघटनांनी दिलेल्या निवेदना वरून प्रशासन काय कार्यवाही करते की,या ही वेळेस पाठीशी घालते.? असा सवाल उपस्थित केला जात असुन पंचायत समितीच्या अर्थ विभागात असलेल्या या वरिष्ठ लेखापालला अर्थपूर्ण घडामोडीत इंटरेस्ट असल्याने माझे कोण काय करून घेईल या अविर्भावात वावरणारा हा कर्मचारी गेली अनेक वर्षे कोणच्या आशीर्वादाने एकाच ठिकाणी काम करीत आहे? असा ही सवाल आता विचारला जात आहे.

प्रतिनियुक्ती वर नाशिकच्या जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागात काम करून बागलाण पंचायत समितीच्या अर्थ विभागाचे कामकाज पाहणाऱ्या या कर्मचारीने पेन्शनधारक संघटनेच्या पदाधिकारी व पेन्शनधारकशी केलेले गैरवर्तनावर कार्यवाही होणार की ?पेन्शधारकांना आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल ते येणाऱ्या काळातच समजणार असले तरी प्रशासनातील अश्या मुजोर कर्मचारीवर कार्यवाही करण्याची मागणी पेन्शन धारक संघटनाने केली आहे. या निवेदनावर संघटनेचे सरचिटणीस पंढरीनाथ बोरसे,एकनाथ जाधव ,आनंदराव पाटील,बाळू देवरे, रामदास जाधव व पेन्शन धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

satana Panchayat Samiti Pension Association


Previous Post

सिन्नर – ठाणगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरसचा मृत्यू

Next Post

CBI नाशिक कारवाई – लाचखोर मेजर आणि इंजिनिअरला थोड्याच वेळात कोर्टात आणणार

Next Post

CBI नाशिक कारवाई - लाचखोर मेजर आणि इंजिनिअरला थोड्याच वेळात कोर्टात आणणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group