India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले… रास्ता रोको… व्यापाऱ्यांनाही घेरले (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 16, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजाड उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुसऱ्या व्यापाऱ्यांना कांदा मार्केटमध्ये खरेदी करु देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नवीन व्यापारी शेतकऱ्यांच्या कांद्यास जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतात. आणि अन्य व्यापारी ठरवून भाव देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सर्व शेतकरी एकत्र जमले आणि त्यांनी थेट लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथे तणावाचे वातावरण तयार झाले.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता जो काही कांदा आहे त्यालाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच कांदा व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम संपला. त्यांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. याची तत्काळ दखल घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांसोबत पोलिसांनी चर्चा सुरू केली आहे

सटाण्यात संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले pic.twitter.com/XdGQHxUGlL

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 16, 2023

Satana Onion Farmer Aggressive Agitation Rasta Roko


Previous Post

केंद्र सरकारचा डॉक्टरांना जोरदार दणका… औषधांबाबत काढले हे आदेश… दिला हा इशाराही

Next Post

त्यांनी अशुभ काळात निवडणुकीचा फाॅर्म भरला… स्मशानात प्रचार सभा घेतल्या… अन् ते निवडून आले… कोण आहेत ते?

Next Post

त्यांनी अशुभ काळात निवडणुकीचा फाॅर्म भरला... स्मशानात प्रचार सभा घेतल्या... अन् ते निवडून आले... कोण आहेत ते?

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group