मुंबई – झी मराठी या वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय स्पर्धा सारेगम लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा येत्या ५ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. या अंतिम सोहळ्यात सात स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. त्यात ओंकार कानिटकर (ठाणे), गौरी गोसावी (मुंबई), प्रज्योत गुंडाळे (परभणी), सारंग भालके (संगमनेर), रित नारंग (मुंबई), पलाक्षी दीक्षित (विरार), स्वरा जोशी (मुंबई) यांचा समावेश आहे. या सोहळ्यापूर्वी सातही स्पर्धकांना विविध मान्यवरांच्या भेटी घडविल्या जात आहेत. याचअंतर्गत या स्पर्धकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व स्पर्धकांनी राज यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. तसेच, राज यांच्या विनोदी स्वभावाचे दर्शनही त्यांना झाले. या सर्वांनी राज यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीत सातही जण भारावून गेले होते.
https://twitter.com/zeemarathi/status/1465168645148090369?s=20