नाशिक – पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज एक महत्त्वाची वाहतूक अधिसूचना काढली आहे. शहरामध्ये ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत हे संमेलन आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन शुक्रवारी (३ डिसेंबर) होत आहे. या उदघाटन समारंभापूर्वी नाशिक शहरातून ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. त्याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी शहरातील प्रमुख ९ मार्गांवर वाहतूक बंदीचे आदेश काढले आहेत. सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीत ही वाहतूक बंदी राहणार आहे. वाहतूक बंद असलेले मार्ग आणि त्यास पर्यायी असलेले मार्ग असे