शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IPL 2022: रोहित शर्माचे मानधन वाढले, विराट आणि धोनीचे घटले

आगामी हंगामासाठी या खेळाडूंनी कायम राखले संघात स्थान

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 12:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IPL

मुंबई – आयपीएलच्या २०२२ सालच्या हंगामासाठी सर्व आठ संघांनी राखून ठेवलेल्या (रिटेन) खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबई इंडियन, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांनी चार-चार खेळाडूंना रिटेन केले आहे. तर हैदराबाद, राजस्थान आणि बंगळुरूने तीन-तीन खेळाडूंना रिटेन केले आहे. तर पंजाबच्या संघाने दोन खेळाडूंना रिटेन केले आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मला १६ कोटी रुपयांनी रिटेन केले आहे. या वर्षी त्याच्या मानधनात एक कोटीने वाढ झाली आहे. तर बंगळुरू संघाने विराट कोहलीला १५ कोटींचे मानधन दिले आहे. गेल्या हंगामात विराटला १७ कोटी रुपये दिले होते. परंतु या वर्षी त्याच्या मानधनातून दोन कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता रोहित शर्माला विराटपेक्षा अधिक मानधन मिळाले आहे.

रवींद्र जडेजा याला चेन्नईने १६ कोटी रुपयांमध्ये आणि ऋषभ पंत याला दिल्लीने १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. महेंद्रसिंग धोनीला चेन्नईने रिटेन केले असून त्याला १२ कोटी रुपये इतके मानधन दिले आहे. गेल्या हंगामात धोनीला १५ कोटी रुपये मानधन मिळाले होते. यंदा त्याच्या मानधनातून तीन कोटींची कपात करण्यात आली आहे. आता जडेजा आणि पंत याला धोनीपेक्षा अधिक मानधन मिळणार आहे. आयपीएलच्या कोणत्या संघात, कोणते खेळाडू रिटेन करण्यात आले आहेत हे जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सच्या रिटेन यादीत यंदा सूर्यकुमार यादव याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरेन पोलार्ड हे खेळाडूसुद्धा संघामध्ये कायम राहिलेलेल आहेत. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर पर्समधून ४२ कोटी रुपयांची कपात होणार आहे.
१ रोहित शर्मा – १६ कोटी रुपये
२ जसप्रित बुमराह – १२ कोटी रुपये
३ सूर्यकुमार यादव – ८ कोटी रुपये
४ कायरन पोलार्ड – ६ कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू एबी डीव्हीलियर्स याने निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल याला रिटेन केले आहे. त्याशिवाय आरसीबीने मोहम्मद सिराज याला रिटेन केले आहे. सिराजने गेल्या हंगामात चांगली गोलंदाजी केली होती. विराट कोहलीला १७ कोटी रुपये मिळाले होते. या हंगामात १५ कोटी रुपये मिळणार आहे. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर संघाच्या पर्समध्ये ३३ कोटी रुपये असतील.
१ विराट कोहली – १५ कोटी रुपये
२ ग्लेन मॅक्सवेल – ११ कोटी रुपये
३ मोहम्मद सिराज – ७ कोटी रुपये

पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज संघात यंदा मोठी यादी पाहायला मिळाली आहे. के. एल. राहुल याने रिटेन करण्यासाठी नकार दिला होता. आता तो मोठ्या लिलावात दिसणार आहे. पंजाब फ्रेंचाइजीने मयांक अग्रवालला पहिल्या स्थानावर रिटेन केले आहे. मयंकमध्ये मोठी धावसंख्या करण्याची तसेच वेगवान खेळण्याची क्षमता आहे. संघाने गोलंदाज अर्शदीपला रिटेन केले आहे. दोन खेळाडूंना रिटेन केल्यावर संघाच्या पर्समधून १८ कोटी रुपये कपात होणार आहेत.
१ मयंक अग्रवाल- १२ कोटी रुपये (पर्सधून १४ कोटी रुपयांची कपात झाली. कारण दोन खेळाडूंमध्ये एकाला १४ कोटी रुपये देणे आहे)
२ अर्शदीप सिंह – ४ कोटी रुपये (अनकॅप्ड खेळाडूला कमाल ४ कोटी रुपये दिले जाऊ शकतात.)

सनरायजर्स हैदराबाद
केन विलियम्सनला रेिटेन करण्यात आले आहे. डेव्हीड वॉर्नरने आधीच संघातून माघार घेतली होती. फ्रेंचाइजीने राशिद खानलासुद्धा रिलीज केले आहे. आपल्याला पहिल्या स्थानावर रिटेन करावे अशी मागणी रशिद खानने केली होती. त्याला फ्रेंचाइजीने नकार दिला होता. त्याशिवाय उमरान मलिक आणि अब्दुल समदला रिटेन करण्यात आले आहे. उमरानने या वर्षीच्या हंगामात सर्वांना प्रभावित केले होते. तो १५० किमी प्रतितास या वेगाने गोलंदाजी करू शकतो. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर संघाच्या पर्समधून २२ कोटी रुपये कपात होणार आहेत.
१ केन विलियम्सन – १४ कोटी रुपये
२ अब्दुल समद – ४ कोटी रुपये
३ उमरान मलिक ४ कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल २०२१ चे विजेते चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या रिटेन करण्यात आले आहे. धोनीचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. तसेच रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड या तिघांनाही रिटेन करण्यात आले आहे. यंदा जडेजाला १६ कोटी रुपये मिळाले आहेत. धोनीच्या मानधनातून तीन कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याला १२ कोटी रुपये मिळतील. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईल अलीला ८ कोटी रुपये मिळतील. चार खेळाडूंना रिटेन केल्यामुळे फ्रेंचाइजीच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कपात होतील.
१ रवींद्र जडेजा – १६ कोटी रुपये
२ एमएस धोनी – १२ कोटी रुपये
३ मोईन अली – ८ कोटी रुपये
४ ऋतुराज गायकवाड – ६ कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स
आयपीएलमधील सर्वात शानदार संघांपैकी एक असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला या वर्षी रिटेन खेळाडूंची यादी देणे खूपच अवघड काम होते. २०१९ आणि २०२० मध्ये श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली संघ प्ले ऑफमध्ये पोहोचली होती. २०२० मध्ये अंतिम सामन्यात पोहोचून दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता. आता श्रेयस अय्यरने संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऋषभ पंतला रिटेन करण्यात आले आहे. इतर तीन खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे यांची नावे आहेत. शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन याच्यासारख्या खेळाडून रिटेन करण्यात आलेले नाही. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर फ्रेंचाइजीच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कपात होणार आहेत.
१ ऋषभ पंत – १६ कोटी रुपये
२ अक्षर पटेल – ९ कोटी रुपये
३ पृथ्वी शॉ – ७.५ कोटी रुपये
४ एनरिक नॉर्टजे ६.५ कोटी रुपये

कोलकाता नाइटरायडर्स
आयपीएल २०२१ मधील रनर अप संघासाठी हा निर्णय घेणे सोपी गोष्ट नव्हती. फ्रेंचाइजीने गेल्या हंगामातील कर्णधार इयॉन मॉर्गन याला रिटेन केलेले नाही. गेल्या हंगामात मॉर्गनला सूर गवसलाच नव्हता. त्याचे वयही वाढले आहे. त्यामुळे संघाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. दिनेश कार्तिकलाही रिटेन करण्यात आले नाही. कोलकाता संघाला आता युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण करण्यावर भर द्यायचा आहे. त्यामुळेच कोलकाता हा एकमेव संघ आहे ज्याने त्यांच्या यादीत दोन परदेशी खेळाडूंना रिटेन केले आहे. आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांना रिटेन केले आहे. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर फ्रँचाइजीच्या पर्समधून ४२ कोटी रुपयांची कपात होणार आहे.
१ आंद्रे रसेल – १२ कोटी रुपये
२ वरुण चक्रवर्ती – ८ कोटी रुपये
३ वेंकटेश अय्यर – ८ कोटी रुपये
४ सुनील नारायण – ६ कोटी रुपये

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरला रिलीज केले आहे. स्टोक्स आरआरकेसाठी विशेष काही करू शकला नव्हता. तर आर्चर गेल्या दोन हंगामात दुखापतग्रस्त झाला होता. कर्णधार संजू सॅमसन याला रिटेन करण्यात आले आहे. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांना सघांत रिटेन केले आहे. चार खेळाडूंना रिटेन केल्यावर फ्रेंचाइजीच्या पर्समधून २२ कोटी रुपये कपात होणार आहेत.
१ संजू सॅमसन – १४ कोटी रुपये
२ जोस बटलर – १० कोटी रुपये
३ यशस्वी जायस्वाल – ४ कोटी रुपये

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज इंडिया दर्पणचे सांस्कृतिक संपादक देविदास चौधरी यांच्या कवितासंग्रहाचा सायंकाळी प्रकाशन सोहळा

Next Post

‘सारेगमप’ लिटिल चॅम्पने घेतली राज ठाकरे यांची भेट

Next Post
FFgG3U4VQAINKLo

'सारेगमप' लिटिल चॅम्पने घेतली राज ठाकरे यांची भेट

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

मे 17, 2025
Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011