मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चंद्रशेखर गुरुजी आहेत तरी कोण? ते प्रख्यात वास्तूशास्त्र तज्ज्ञ कसे बनले? असा आहे त्यांचा जीवन प्रवास

by India Darpan
जुलै 7, 2022 | 5:41 am
in राष्ट्रीय
0
FW6AG9taUAcD3Z9

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ व ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हे गुरुजी कामानिमित्त हॉटेलमध्ये गेले असता ही दुर्घटना पोलिसांचा अंदाज आहे. याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत हॉटेलच्या रिसेप्शनमध्येच चंद्रशेखर गुरुजी यांना हल्लेखोरांनी चाकूने भोसकल्याचे दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित नागरिक घाबरुन पळत असल्याचेही दिसत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. हुबळीच्या पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले, मोबाइल टॉवरच्या आधारे आम्हाला काही माहिती मिळाली आहे. तपासानंतरच हत्येमागचे कारण समजू शकेल. आम्ही सध्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवत आहोत. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता.

चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे कर्नाटकच्या बागलकोट येथील होते. तिथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते इथेच स्थायिक झाले. दोन वर्ष त्यांनी रिअल इस्टेट कंपनीत काम केले. यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपली कंपनी सुरु केली. पण एका व्यक्तीने त्यांची फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी अनेक गावे, शहरांचे दौरे केले.

त्यानंतर त्यांनी वास्तू विषयावर अभ्यास सुरु केला. ‘सरल वास्तू’ या कार्यक्रमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते घराघरात पोहोचले. वास्तू विषयावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले होते, त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते परंतु आवश्यक निकष पूर्ण न केल्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम शिक्षणाचे ध्येय ठेवले आणि बागलकोटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर मुंबईत कंत्राटदार म्हणून कारकीर्द सुरू केली.

विशेष म्हणजे काही वर्षे बांधकाम कंपनीत काम केल्यानंतर चंद्रशेखर यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. सुरुवातीला चांगली प्रगती झाली पण नंतर त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. याच दरम्यान, त्याचे वास्तूबद्दलचे प्रेम वाढत गेले. बांधकाम सुरू असतानाच त्यांनी लोकांची घरे चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे पाहिले. त्यानंतर ते वास्तूचा अभ्यास करण्यासाठी सिंगापूरला गेले.

परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी वास्तूशी संबंधित काम पाहण्यास सुरुवात केली. त्यांनी प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्रावर आधारित एक साधी वास्तुरचना केली. सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. लोकांच्या समस्यांवर ते सोपे उपाय सुचवायचे. हळुहळू मागणी वाढत गेल्याने त्यांनी बंगळुरू, हुबळी आणि कर्नाटकातील इतर शहरांमध्ये कार्यालये उघडली. मुंबईत एक कॉल सेंटर आहे जिथे शेकडो कर्मचारी नागरिकांना वास्तूबद्दल सल्ला देतात.

नागरिकांची वास्तू शास्त्राबद्दलची वाढती आवड लक्षात घेऊन डॉ.चंद्रशेखर गुरुजींनी ‘सरल वास्तू’ नावाची वाहिनी सुरू केली. चंद्रशेखर यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर वास्तूमध्ये बदल करून अनेक जण समृद्ध झाले, असे सांगतात, चंद्रशेखर गुरुजी अनेक खासगी वाहिन्यांवरही सल्ला देत असत. काही काळापूर्वी चंद्रशेखर यांच्यावर सरल वास्तूच्या नावाने वास्तुशास्त्रातील वास्तवाचे अवमूल्यन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

Saral Vastu fame Chandrashekhar Guruji murder life history

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हॉटेलच्या खोलीत नवरा अभिनेत्रीसोबत सापडला; मग तिसऱ्या पत्नीने हे सगळं केलं (बघा व्हिडिओ)

Next Post

उद्धव यांना आणखी एक धक्का; विदर्भातील या नेत्याने दिला नेतेपदाचा राजीनामा

India Darpan

Next Post
aditya uddhav thackeray

उद्धव यांना आणखी एक धक्का; विदर्भातील या नेत्याने दिला नेतेपदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011