इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत ज्येष्ठ अभिनेता कृष्णाचा मुलगा आणि सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या लग्नाच्या बातम्या जोरात आहेत. रिपोर्ट्सनुसार, नरेश बाबू पवित्रा लोकेशसोबत लग्न करणार आहे. हे नरेश बाबूचे चौथे लग्न असणार आहे.
नरेशची तिसरी पत्नी राम्या (रम्या रघुपती) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. म्हैसूरमध्ये पवित्रा लोकेशच्या हॉटेलच्या खोलीबाहेर राम्याने गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे. राम्याने नरेशला चप्पलने मारण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी पोलिसही हस्तक्षेप करताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की नरेशच्या तिसऱ्या पत्नीने लोकेशला चप्पलने मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी रम्याला रोखले आणि बराच गोंधळ झाल्यानंतर तिला हॉटेलमधून जायला लावले. तर दुसरीकडे नरेशही रम्याला ओरडताना दिसला.
Naresh pavithra lokesh hotel issue video pic.twitter.com/Zazh02eL9B
— 비카타카비 17 – Siddham (@Vikatakavi17) July 3, 2022
अभिनेत्याची तिसरी पत्नी रम्या रघुपती हिने आरोप केला आहे की नरेशने तिला घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची धमकी दिली होती, परंतु पवित्रा लोकेशने सांगितले की नरेश एक सज्जन व्यक्ती आहे आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. तसेच तिने नरेशसोबतच्या लग्नाच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी नरेश म्हणतो की त्याने पत्नी रम्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, त्यानंतर ती त्याची बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहे.
५९ वर्षीय नरेश हा दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. नंतर विजयाने महेश बाबूचे वडील आणि अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केले. नरेश हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. रम्या त्याची तिसरी पत्नी आहे. असे म्हटले जाते की त्याने पहिले लग्न डान्स मास्टर श्रीनूच्या मुलीशी आणि दुसरे लग्न रेखा शास्त्रीशी केले आहे.
Tollywood Kannad Actress Pavitra Lokesh affair video viral husband wife