सप्तश्रृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तश्रृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांनी ट्रस्टप्रशासन व रोपवे चालकांच्या मनमानी कारभारा विरोधात कडकडीत बंद पाळला. मंदीर गाभा-यात नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची अरेरावी तसेच रोपवे मधून येणा-या भाविकांना अगोदर दर्शन दिले जाते, स्थानिकांना देण्यात येणारी मुभा ट्रस्ट प्रशासनाने बंद केली तर खासगी सुरक्षा रक्षकांना नेमतांना स्थानिक तरुणांना डावलण्यात येत असल्याच्या निषेर्धात ग्रामस्थांनी हा बंद पुकारला आहे. या बंदमुळे प्रसादाच्या दुकानांसह येथील, हॉटेल, उपहारगृह बंद असल्याने देवीच्या दर्शनाला येणा-या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. या बंदमुळे देवीच्या पहिल्या पायरी टप्प्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.