इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांतवर एका विवाहितेने फसवणूक, मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत या महिलेने सिध्दांतला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. त्यात मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
जान्हवी सिध्दांत शिरसाट असं महिलेचं नाव असून तिने सिध्दांत बरोबर लग्न केल्याचा दावा केला आहे. जान्हवीला नांदायला नकार दिल्यामुळे या महिलेने थेट कायदेशीर मार्ग निवडला. तिने छत्रपती संभाजी नगरमध्ये येण्याचा आग्रह, पण, तिला येऊ दिलं नाही. मुंबईलाच रहायला सांगितले.
चेंबूर येथे प्लॅटवर दोन वर्षापूर्वी जान्हवीसोबत सिध्दांतने लग्न केले. त्यावेळी फॅमिली उपस्थितीत होती. दोन वर्ष चांगले गेले. पण त्यानंतर सिध्दांचे तिस-या मुलीसोबत प्रेमसंबध सुरु झाले. त्यानंतर त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता आम्ही कायदेशीर मार्ग निवडला असून सात दिवसाच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही कायदेशीर नोटीस दिली असल्याचे वकील ठोंबरे यांनी सांगितले.