India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हिंमत हारु नका… मेकॅनिकच्या कन्येची ऐतिहासिक भरारी… सानिया बनणार हवाई दलात पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in राष्ट्रीय
0

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गगनात भरारी घेण्यासाठी पंखात बळ तसेच इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर निश्चितच आकाशालाही गवसणी घालता येते असे म्हटले जाते की, उत्तर प्रदेशातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हवाई दलात असेच उल्लेखनीय यश मिळवले आहे, याचीच आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. मिर्झापूरची सानिया मिर्झा ही पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट होणार आहे.
सानियाने गुरू नानक गर्ल्स इंटर कॉलेज, मिर्झापूरमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून ती यूपी बोर्डात जिल्हा टॉपर आहे. त्यानंतर तिने दि. १० एप्रिल रोजी एनडीए २०२२ ची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुलाखतीची तयारी करण्यासाठी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. आता सानिया दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यातील खडकवासला एनडीएमध्ये सामील होणार आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या देहत हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावची रहिवासी आहे. सानियाने एनडीए परीक्षेत १४८ वा क्रमांक पटकावला आहे. सानिया हीने गुरू नानक गर्ल्स इंटर कॉलेज, मिर्झापूरमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर व्यवसायाने टीव्ही मेकॅनिक असलेले सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले, ‘सानिया मिर्झा देशाची पहिली फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला आपला आदर्श मानते. पहिल्यापासूनच तिला त्याच्यासारखं व्हायचे होते. सानिया ही देशातील फायटर पायलट म्हणून निवड झाली दुसरी मुलगी आहे.

सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणाली, ‘आमच्या मुलीने आम्हाला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटला आहे. फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या गावातील प्रत्येक मुलीला प्रेरित केले आहे. खरे म्हणजे सानिया पहिल्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. या संदर्भात सानिया म्हणाली की, मला नेहमीच फायटर पायलट बनायचे होते. सानियाचा प्रेरणास्रोत अवनी चतुर्वेदी ही देशातील पहिली महिला पायलट आहे. पहिल्यापासूनच तिला त्याच्यासारखे व्हायचे होते.

विशेष म्हणजे, नॅशनल डिफेन्स अकादमी २०२२ च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी एकूण ४०० जागा होत्या, ज्यामध्ये १९ जागा महिलांसाठी होत्या. त्याच वेळी, यापैकी २ जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. या दोनपैकी एक जागा सानिया मिर्झाने मिळवली आहे. सध्या सानिया मिर्झाचे सगळीकडे कौतुक सुरू आहे. पहिली महिला पायलट अवनी चतुर्वेदीच्या प्रेरणेने सानिया मिर्झाने हे स्थान मिळवले आहे, सानिया मिर्झाला पहिल्यांदा यश मिळाले नाही पण तिने हार मानली नाही आणि दुसऱ्यांदा ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करून आपले नाव कमावले आहे.

Sania Mirza: सानिया मिर्जा ने किया कमाल, बनेंगी देश की पहली 'मुस्लिम महिला फाइटर पायलट'
मिर्जापुर की रहने वाली सानिया मिर्जा ने एनडीए का एंट्रेस पास किया है। वह महिलाओं के लिए आरक्षित 19 सीटों में दूसरे नंबर पर हैं। उनका चयन फ्लाइंग विंग में हुआ है। 1/2@asadowaisi pic.twitter.com/cPC9AqGGzl

— Abdul AJIJ (@Abdul_Ajij_) December 24, 2022

Sania Mirza First Indian Muslim Women Fighter Pilot


Previous Post

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार या शहरापर्यंत

Next Post

साधी शिक्षिका ते थेट मिसेस वर्ल्ड २०२२… असा आहे सरगम कौशलचा यशोप्रवास

Next Post

साधी शिक्षिका ते थेट मिसेस वर्ल्ड २०२२... असा आहे सरगम कौशलचा यशोप्रवास

ताज्या बातम्या

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group