India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

समृद्धी महामार्ग काही दिवसातच उदघाटन; भरावा लागणार एवढा टोल

India Darpan by India Darpan
September 29, 2022
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाची आर्थिक व महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांना जोडणारा ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग आता सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. तो बनवण्यासाठी सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने वाहने चालवता येतील.

दिवाळीत उदघाटन
या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याचंच उद्घाटन दिवाळीत होणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई हे जिल्हे आणि जवळपास २६ तालुके आणि ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.

एवढी असेल वेगमर्यादा
महामार्गाची एकूण रुंदी १२० मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही २२.५ मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १५० किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही. या महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे. जवळपास ५० पेक्षा जास्त उड्डाणपुल, २४ हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच ५ बोगदे प्रस्तावित आहेत.

इतक्या वर्षांसाठी टोल
या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागणार आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावर टोल दराची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे २०२५ पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट ७०१ किमी अंतरासाठी जवळपास १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारणी होणार आहे. हा महामार्ग खासगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे.

वाहनांनुसार टोल
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गावर मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. १० ) तसेच हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. त्याशिवाय, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी (चौदा किंवा जास्त चाकांची वाहने) ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.

Samruddhi Highway Opening Toll Rates Vehicles
Mumbai Nagpur


Previous Post

पोलिसांप्रमाणेच आता राज्य उत्पादन शुल्कला अधिकारी आणि जबाबदारी; मंत्र्यांचे सूतोवाच

Next Post

या टोल फ्री क्रमांकाला फोन करताच अर्ध्या तासामध्ये मिळणार आरोग्य सुविधा; राज्य सरकारचा निर्णय

Next Post
प्रातिनिधीक फोटो

या टोल फ्री क्रमांकाला फोन करताच अर्ध्या तासामध्ये मिळणार आरोग्य सुविधा; राज्य सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

महाराष्ट्र तीन पुरस्कारांनी सन्मानित; सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्रदान

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group