India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोलिसांप्रमाणेच आता राज्य उत्पादन शुल्कला अधिकारी आणि जबाबदारी; मंत्र्यांचे सूतोवाच

India Darpan by India Darpan
September 29, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या कल्याणासाठी पोलीस विभागात अनेक योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांसाठी योजना राबविण्यात याव्यात. या योजनांबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागातील विविध कल्याणकारी योजना या राज्य उत्पादन शुल्क विभागात राबविण्याबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. या महसुलाचे संवर्धन करणे व वाढ करणे ही मुख्य जबाबदारी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे. गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुप्त माहिती देणारे खबऱ्यांची यंत्रणा पोलीस विभागाप्रमाणे अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पोलीस विभागात शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी जसे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण द्यावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतीचे नमुना नकाशे सुधारित करावे व या नकाशात राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाच्या आवारात सेवा सदनिकांचाही नकाशात समावेश करावा, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

पोलीस कल्याण निधी धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागात योजना राबविणे, पोलीस विभागात कार्यान्वित असलेली गोपनीय सेवा निधी योजना राज्य उत्पादन शुल्क विभागात राबविणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारत बांधकाम आराखडा निधीत वाढ करणे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी पोलीस विभागाप्रमाणे अद्ययावत प्रशिक्षण देणे याबाबत बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीस अपर मुख्य सचिव नितीन करीर ,अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग कांतीलाल उमाप, उपसचिव राज्य उत्पादन शुल्क युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Police State Excise Department Big Reforms
Minister Shambhuraj Desai


Previous Post

चिंताजनक! कोरोना झालेल्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता इतके पट अधिक

Next Post

समृद्धी महामार्ग काही दिवसातच उदघाटन; भरावा लागणार एवढा टोल

Next Post

समृद्धी महामार्ग काही दिवसातच उदघाटन; भरावा लागणार एवढा टोल

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group