मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावरुन बराच वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा एक जन्म दाखला शेअर केला होता. त्यानुसार समीर हे जन्माने मुस्लीम आहेत. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. त्यात त्यांनी चुकीच्या आरक्षणाद्वारे नोकरी मिळविल्याचा मलिक यांचा आरोप आहे. यासंदर्भात आता न्यायलयीन लढाईही सुरू झाली आहे. वानखेडे यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही या आरोप-प्रत्यारोपात आपल्या पतीची बाजू लावून धरली आहे. आता क्रांती यांनी समीर यांचा जन्म दाखला शेअर केला आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. क्रांती यांनी दाखला पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तो डिलीट केला. मात्र, अल्पावधीतच हा दाखला व्हायरल झाला आहे. क्रांती यांनी शेअर केलेला वानखेडे यांचा असा आहे जन्म दाखला
https://twitter.com/PhogatFilms/status/1460973700379930631