छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या उंच इमारतीत लिफ्ट बंद पडणे किंवा लिफ्ट मध्ये व्यक्ती अडकून राहणे अशा घटना अनेकदा घडतात. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अशीच एक हृदय द्रावक घटना घडली. एका बालिकेचे आई-वडील हैदराबादला गेल्यामुळे आजी-आजोबांकडे राहणाऱ्या मुलाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सुमारे १३ वर्षाच्या मुलाचे डोके तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली येताना लिफ्टमध्ये आडकले. यातच त्यचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कटकट गेट परिसरातील इमारतीत रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव साकिब सिद्दीकी इरफान सिद्दीकी (१३, रा. शहाबाजार) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकिबचे वडील टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात नोकरीला आहेत. त्यांचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कामानिमित्त साकीबचे आई-वडील हैदराबादला गेले आहेत. त्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा साकिबला आजी-आजोबाकडे सोडले होते. त्याला दोन बहिणी असून, तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रात्री तो लिफ्टमध्ये इतर मुलांसोबत खेळत होता. त्यातच ही वाईट घटना घडली कारण त्याने खेळता खेळता लिफ्ट सुरू केली आणि डोके बाहेर काढले. काही समजण्याच्या आतच त्याचे डोके लिफ्टमध्ये अडकले. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यावरील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. सदर इमारत तीन माजल्याची आहे. या इमारतीमध्ये असलेली लिफ्ट अतिशय धोकादायक आहे. चॅनल गेट असून, लिफ्टला सेन्सरही नाही. मधेच लिफ्ट बंद पडते.
Sambhajinagar Child Death Building Lift Head Stuck