India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘द केरळ स्टोरी’ची अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. तिच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे. अदानेच सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

अभिनेत्री अदाने सांगितले की ती पूर्णपणे बरी आहे. तिनी ट्विट केले की काळजी करण्यासारखे काही नाही. ती आणि तिची संपूर्ण टीम ठीक आहे. आमच्या अपघाताची बातमी व्हायरल झाल्यानंतर मला अनेक लोकांकडून मेसेज येत आहेत. आमची संपूर्ण टीम आणि आम्ही पूर्णपणे निरोगी आहोत. कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार.

सध्या द केरळ स्टोरीवरून वाद सुरू आहे. अदा शर्मासह चित्रपटाशी संबंधित लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. लव्ह जिहाद, धर्मांतर यासारखे मुद्दे चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यांचा धर्म बदलून त्यांना ISIS मध्ये भरती करून दहशतवादी बनवले जाते.

केरळमधून बेपत्ता झालेल्या ३२ हजार मुलींचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी सीरियात पाठवण्यात आल्याचा दावा या चित्रपटाच्या माध्यमातून केला जात आहे. या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी तुम्हाला हादरवून सोडतील. या चित्रपटाला राजकीय पक्ष आणि गटांच्या एका वर्गाकडून विरोध होत आहे. हा चित्रपट वस्तुस्थितीवर आधारित नसून मुस्लीम समाजाविरुद्ध द्वेषाला चालना देतो, असा त्यांचा दावा आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे.

I'm fine guys . Getting a lot of messages because of the news circulating about our accident. The whole team ,all of us are fine, nothing serious , nothing major but thank you for the concern ❤️❤️

— Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023

The Kerala Story Actress Adah Sharma Accident


Previous Post

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार, समाजाच्या मागण्यांसाठी मंत्रालयात बैठक; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

अतिशय हृदयद्रावक! बिल्डींगच्या लिफ्टमध्ये डोके अडकून बालकाचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

अतिशय हृदयद्रावक! बिल्डींगच्या लिफ्टमध्ये डोके अडकून बालकाचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group