मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समाजकल्याण ‘शिष्यवृत्ती’धारक विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश..देशातील ‘टॉप २०’ उद्योन्मुख ‘स्टार्टअप’ मध्ये निवड.

by India Darpan
जुलै 6, 2021 | 5:28 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210706 WA0022 1 e1625592471566

नाशिक -सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेतलेल्या पुष्कराज साळुंके व प्रितेश महाजन या विद्यार्थ्यांनी उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांनी जयेश टोपे या सहकाऱ्यांस सोबत घेऊन बनविलेल्या ‘रिव्हॅम्प मोटो’ या नाशिकस्थित ‘स्टार्टअप’ ने नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या ‘ २० मॉड्यूलर हेवी-ड्यूटी इलेक्ट्रीकल व्हेइकल स्टार्टअप’ मध्ये आपले स्थान पटकावले आहे.
अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनी अल्टैर इंडिया, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, भारतीय उद्योग महासंघ आणि आय.आय.टी,मद्रास यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘अल्टैर स्टार्टअप चैलेंज’ या स्पर्धेत या तिन्ही विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप’ ने पहिल्या २० मध्ये स्थान पटकावले आहे. पुष्कराज साळुंखे याने एनडीएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व प्रितेश महाजन याने सपकाळ नॉलेज हब येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण सामाजिक न्याय विभागाच्या ‘भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती’ मधून पूर्ण केले आहे.
‘अल्टैर स्टार्टअप चैलेंज’ स्पर्धेत देशभरातून १५० हून अधिक ‘स्टार्टअप’ने सहभाग नोंदविला होता.  पुष्कराज, प्रितेश व जयेश या तीघांनी मिळविलेल्या यशाबद्दल सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या ‘स्टार्टअप’ साठी सरकारी पातळीवर लागणाऱ्या मदतीसाठी सहयोग करणार असल्याचे ही सांगितले आहे.
काय आहे ‘रिव्हॅम्प मोटो स्टार्टअप’ –
भारतात दूचाकी वाहनांचा वापर फक्त प्रवास करण्यासाठी केला जात नाही. दूचाकीच्या माध्यमातून हातावर पोट असलेले व्यक्ती व्यवसाय म्हणून ही वापर करतात. दूध घरोघरी पोहचविणे, पोहे-उपमा-इडलीचे स्टॉल, चहा विक्री अशा प्रकारचे असंख्य व्यवसाय दूचाकीच्या माध्यमातून केले जातात. हे व्यवसाय करण्यासाठी  आपल्या वाहनांमध्ये जुगाड करून म्हणजे वेल्डींग, मॉडीफिकेशन वगैरे करून ‘दूचाकी ’ला व्यवसायासाठी तयार करतात. यामुळे गाडीची व्यवस्थित बांधणी न झाल्यामुळे अशा वाहनांची अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुळात ‘दूचाकी’ ही या व्यवसायांसाठी नसते; पण पोट भरण्यासाठी दूचाकीचा व्यवसाय म्हणून वापर करणे, हातावर पोट असलेल्या लोकांना आवश्यक आहे. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन या ‘स्टार्टअप’ मध्ये लोकांना व्यवसाय करण्यास सुलभ होईल. असे सात प्रकारचे ‘मॉड्यूलर’ या तिघांनी बनविलेले आहेत. या ‘मॉड्यूलर’चा वापर करून आपण सहजपणे कुठेही व्यवसाय करू शकतो. विशेष म्हणजे या मॉड्यूल सोबत ‘स्मार्ट व्हेइकल ऐज ॲसेट (SVA)’ ही संकल्पना वापरत त्यांनी या ‘स्टार्टअप’ मधील ‘मॉड्यूलर’ साठी सहाय्य ठरेल अशा ‘इलेक्ट्रीकल व्हेईकल’ची निर्मिती ही केली आहे. यामुळे प्रदुषणाला अटकाव व इंधन बचत ही सहज शक्य होणार आहे.  या आगळ्या-वेगळ्या ‘स्टार्टअप’ ला सरकारी पातळीवर उत्तेजन मिळल्यास हे ‘स्टार्टअप’ फिरते विक्रते, व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर मुहुर्त ठरला! मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार यावेळी होणार

Next Post

सुरगाणा – आमझर येथे तेरा बक-यांचा वाघाने पाडला फडशा, पशुपालक हवालदिल

India Darpan

Next Post
IMG 20210706 WA0089 e1625592775958

सुरगाणा - आमझर येथे तेरा बक-यांचा वाघाने पाडला फडशा, पशुपालक हवालदिल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011