गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने क्रिकेट करिअरसाठी घेतला हा मोठा निर्णय

ऑगस्ट 13, 2022 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
arjun tendulkar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही खेळ असो, त्यामध्ये खेळाडूला संधी मिळणे आवश्यक असते. विशेषतः सराव करणे आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळला तर त्या खेळाडूची कामगिरी चांगली होऊ शकते, अन्यथा त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही तर निराशा येऊ शकते, सध्या देखील एका युवा क्रिकेट खेळाडूंनी संधी अभावी वेगळ्या संघात नेहमीच्या संघात दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. तो खेळाडू म्हणजेच जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर होय. अर्जुनने त्याच्या क्रिकेट करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा सध्या वयाने २२ वर्षाचा असून अर्जुन तेंडूलकरने त्याच्या क्रिकेट करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्जुन तेंडुलकर पुढील रणजी हंगामापूर्वी मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते, जे त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील देशांतर्गत क्रिकेटचा सीझन तो गोव्यासाठी खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाचा भाग असूनही अर्जुन तेंडुलकरला मुंबईसाठी फारसे सामने खेळायला मिळालेले नाहीत, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, “करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे नवे पर्व सुरु करत आहे.”

गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांच्या माहितीनुसार, “अर्जुन तेंडुलकरला गोव्यासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळायचे आहे, त्यासाठी त्याच्याशी चर्चा सुरु आहे. विपुल फडके यांच्या म्हणण्यानुसार अर्जुन तेंडुलकरला एमसीएची एनओसी मिळाल्यानंतर त्याची फिटनेस चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला गोवा संघात प्रवेश मिळू शकेल.

अर्जुन तेंडुलकर गेल्या मोसमातच मुंबईच्या रणजी संघात सहभागी झाला होता. परंतु सीनियर संघात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळलेला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर यापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाचा भाग होता. तर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा तो सदस्य आहे. मात्र, इथेही अर्जुन तेंडुलकरला गेल्या दोन हंगामात एकही सामना खेळायला मिळालेला नाही. अर्जुनने देशांतर्गत टी-20 स्पर्धा, सईद मुश्ताक अली ट्रॉफीचे दोन सामने मुंबईसाठी खेळले आहेत. त्याने हरियाणा आणि पाँडिचेरीविरुद्ध मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

अर्जुन तेंडुलकरच्या आधी भारताच्या आणखी एका माजी कर्णधाराचा मुलगा गोव्या संघात सहभागी झाला होता. हा मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असदुद्दीनने 2018 च्या हंगामात रणजी ट्रॉफीचे दोन सामने खेळले होते. याशिवाय सुनील सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन देखील वेगळ्या राज्यासाठी खेळला आहे. रोहन 18 वर्षांचा असताना बंगालला गेला. संघाकडून खेळताना राज्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. एवढंच नाही तर अनेक हंगामात कर्णधारपदही भूषवले आहे. आता आणखी चांगली संधी मिळावी अशी त्याची अपेक्षा आहे.

Sachin Tendulkar Son Arjun Big Decision for Cricket Career
Mumbai Indians Goa IPL Arjun Tendulkar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलांची सर्वाधिक काळजी कोण घेऊ शकते? आई की वडील की अन्य कुणी? उच्च न्यायालय म्हणाले…

Next Post

लाल सिंग चढ्ढा सिनेमावरुन वातावरण तापले; हिंदू व शिख संघटना आमनेसामने

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
Laal Singh Chaddha

लाल सिंग चढ्ढा सिनेमावरुन वातावरण तापले; हिंदू व शिख संघटना आमनेसामने

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011