India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

न्यूझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; रोहित आणि शुभमनचे जबरदस्त शतक, हार्दिकचेही अर्धशतक

India Darpan by India Darpan
January 24, 2023
in मुख्य बातमी
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  भारताने प्रथम फलंदाजी करताना 385 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला आणि निर्धारित 50 षटकांचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या नऊ गडी बाद 385 अशी झाली. इंदूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असून येथे मोठे फटके सहज खेळता येतात. जर न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला तर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याचे भारताचे स्वप्न भंगणार आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित आणि गिल जोडीने पॉवरप्लेमध्ये ८२ धावांची भर घातली. यानंतरही दोघेही थांबले नाहीत आणि पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली. डावाच्या 27व्या षटकात 85 चेंडूत 101 धावा करून रोहित बाद झाला. त्याचवेळी पुढच्या षटकात गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने 78 चेंडूत 112 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव फसला. कोहली 36, किशन 17 आणि सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाले. भारताने 81 धावांत पाच विकेट गमावल्या. वॉशिंग्टन सुंदरही नऊ धावा करून बाद झाला.

हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय डाव सांभाळला. शार्दुल २५ आणि हार्दिक ५४ धावा करून बाद झाला. हार्दिक क्रीझवर होता तोपर्यंत भारताची धावसंख्या ४०० धावांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा होती, पण ४९व्या षटकात तो बाद झाला आणि भारतीय संघ नऊ गडी गमावून ३८५ धावा करू शकला. न्यूझीलंडकडून ब्लेअर टिकनर आणि जॅक दुबे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेलला एक विकेट मिळाली.

रोहित आणि गिलचे विक्रम 
या सामन्यात रोहित शर्माने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले आणि रिकी पाँटिंगची बरोबरी केली. आता फक्त विराट कोहली (46 शतके) आणि सचिन तेंडुलकर (49 शतके) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्यात रोहितच्या पुढे आहेत. त्याचवेळी गिलने या मालिकेत एकूण 360 धावा केल्या आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझमची बरोबरी केली. या सामन्यात गिलने आणखी एक धाव घेतली असती तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असता.

Rohit Sharma and Shubman Gill Century Against New Zealand ODI


Previous Post

क्रिकेटर मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका; पत्नीला द्यावी लागणार एवढी पोटगी

Next Post

महाराष्ट्र उबदार, पण थंडीचा कडाका मुंबई-ठाण्यातच का? हे आहे कारण… उद्या महाराष्ट्रात असे असेल हवामान

Next Post

महाराष्ट्र उबदार, पण थंडीचा कडाका मुंबई-ठाण्यातच का? हे आहे कारण... उद्या महाराष्ट्रात असे असेल हवामान

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group