India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्र उबदार, पण थंडीचा कडाका मुंबई-ठाण्यातच का? हे आहे कारण… उद्या महाराष्ट्रात असे असेल हवामान

India Darpan by India Darpan
January 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा दिड ते दोन तर विदर्भात ३ डिग्री पर्यन्त वाढलेले जाणवत आहे. २६ जानेवारीपर्यंत थंडी कमीच जाणवेल. असे असले तरी मुंबई आणि ठाण्यातच सध्या थंडी जाणवत आहे. दमट हवामान असणाऱ्या मुंबईच्या परिसरातच थंडी का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ठाणे मुंबईतच थंडी का?
मुंबई, ठाणे या विभागाला सह्याद्रीने कुशीत घेतले आहे. अलिबागपासून पुन्हा सह्याद्री पश्चिमेकडे समुद्रात झेपावल्यामुळे उत्तरेकडून गुजरातमार्गे येणारे थंड वारे ठाणे-मुंबईला गारठवतात. पुढे दक्षिण कोकणात म्हणजे उर्वरित रायगड जिल्हा व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना काहीसा अटकाव होतो. त्यामुळे ह्या जिल्ह्यात थंडी कमी जाणवते.

उत्तरेतील थंडी कोकणात पाझरत असल्यामुळे मुंबई उपनगर व ठाण्यात सध्या कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २-३ डिग्रीने घसरण झाली असून थंडी जाणवत आहे. तसेच उद्या दि. २५ जानेवारीला महाराष्ट्रात एक दिवसाकरिता काहीसे ढगाळ वातावरण असेल.
आज, उद्या सध्या जात असलेले पश्चिमी झंजावात २६-२७ ला तर २८-२९ ला येणारे ३०-३१ ला उत्तर भारतात पाऊस-बर्फ पडल्यानंतर थंडी जाणवू शकते.
सध्या इतकेच!

Alert Forecast Winter Cold Climate Maharashtra


Previous Post

न्यूझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; रोहित आणि शुभमनचे जबरदस्त शतक, हार्दिकचेही अर्धशतक

Next Post

फडणवीस-शिंदे दिल्लीत; अमित शहांबरोबर खलबतं… आज दिल्लीत नेमकं काय घडलं?

Next Post

फडणवीस-शिंदे दिल्लीत; अमित शहांबरोबर खलबतं... आज दिल्लीत नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group