इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना शुक्रवारी रात्री उशिरा लेव्हर कप २०२२ मध्ये खेळला. या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी या स्टार खेळाडूने केली होती. तो दुहेरीत लेव्हर कपचा शेवटचा सामना खेळला होता. जिथे त्याचा जोडीदार आणि स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल होता. मात्र, त्यांचा शेवटचा सामना ४-६, ७-६(२), ११-९ असा हरला. सामना संपल्यानंतर सहकारी खेळाडूंना मिठी मारताना आणि भाषण करताना फेडरर खूपच भावूक झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/AwanishSharan/status/1573533323087183872?s=20&t=ppJg7bGJxrF8d9gP7ywwPA
४१ वर्षीय फेडरर, जो काही काळ दुखापतीशी झुंज देत होता, त्याने त्याची शेवटची स्पर्धा विम्बल्डन २०२१ मध्ये खेळली होती. फेडररने त्याच्या कारकिर्दीत एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. तर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत तो तिसरा आहे. फेडररच्या निवृत्तीवेळी त्याचे प्रतिस्पर्धी नदाल आणि जोकोविच हे सुद्धा भावूक झाले. त्यांनाही रडू कसळले. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. हा क्षण पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण, प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही गहिवरुन आल्याने ही बाब दुर्मिळ आणि अभिमानाची असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/LaverCup/status/1573456284820570117?s=20&t=j5cSpmjRnIQqLWBgUb4xbg
नदालच्या नावावर २२ तर जोकोविचच्या नावावर २१ विजेतेपद आहेत. रॉजरने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले, जेतेपदाच्या लढतीत क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा त्याने पराभव केला होता.
https://twitter.com/LaverCup/status/1573460606274895890?s=20&t=vh-TMFOB4-xyL4UFDGGOiA
Roger Federer Farewell Emotional Video
Sports Rafel Nadal
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/