India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा; PFI कार्यकर्त्यांना अटक

India Darpan by India Darpan
September 24, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याने या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनआयए, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्ध हे आंदोलन करण्यात आले. मोठमोठ्याने घोषणा देण्यासह रस्ताही अडवून धरला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. शिवाय, येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करुन त्यांना नाहक त्रास देण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनांकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि १४१, १४३, १४५, १४७, १४९, १८८, ३४१ सह मपोका ३७ / १ / ३सह १३५नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस हवालदार नवनाथ डांगे यांनी याविषयी तक्रार दिली आहे. बंड गार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

#PFI का पाकिस्तान प्रेम!#पुणे में कल #PFI के उन्मादी सदस्यों ने लगाए #पाकिस्तान_जिंदाबाद के नारे #ED और #CBI की कार्रवाई को लेकर कलेक्टर कार्यालय के बाहर इकट्ठा हुए थे कार्यकर्ता। जिसके बाद पुलिस ने आज सुबह कुछ सदस्यों को गिरफ़्तार भी किया है। #Pune #PFICrackdown pic.twitter.com/G6GsNeueOo

— Praveen Mishra 🇮🇳 (@praveenmishramj) September 24, 2022

Pune PFI Activist Agitation Pakistan Zindabad Slogan FIR Arrest
Crime Terrorism 
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली; अमित शहांचा ग्रीन सिग्नल?

Next Post

अतिशय दुर्मिळ आणि भावूक क्षण! फेडररच्या निरोप समारंभात प्रतिस्पर्धी नदाल आणि जोकोविचही रडले (व्हिडिओ)

Next Post

अतिशय दुर्मिळ आणि भावूक क्षण! फेडररच्या निरोप समारंभात प्रतिस्पर्धी नदाल आणि जोकोविचही रडले (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group