शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही; या तब्बल ५८ सेवा घरुनच मिळणार

by India Darpan
सप्टेंबर 19, 2022 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
rto

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो आणि तो परिवहन विभागाच्या कार्यालातून (आरटीओ) दिला जातो. आता केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. विविध कारणांसाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. तब्बस ५८ प्रकारच्या सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्याच सेवा मिळणार आहे.

नवीन नियमांनुसा , कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयाच्या चकरा किंवा फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. रस्ते वाहतूक, परिवहन व महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) या संदर्भात आधीच नोटीस जारी केली आहे. या मंत्रालयाने आता ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच वाहन परवान्यासंबंधीच्या ५८ सेवा आता पूर्णतः ऑनलाईन केल्या आहेत. तसेच मंत्रालयाने याविषयीची अधिसूचनाही जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कार्यालयाला नाहक चकरा मारण्याची गरज उरली नाही. मंत्रालयाने अनेक आरटीओ सेवा डिजीटल केल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय करता येईल आणि आरटीओ कार्यालयाची कार्यक्षमता देखील वाढेल.

ऑनलाइन सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणापासून ते नोंदणी प्रमाणपत्रापर्यंत अनेक सेवा देण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कोणीही या सुविधांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकेल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणीचे प्रमाणपत्र आधारशी लिंक करणे आवश्यक असणार आहे.

परिवहन विभागाच्या ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अरे वन विभागाच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल, ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये दुरुस्ती, या लायसन मध्ये पत्ता बदलणे, आरसी बुक, अशा अनेक महत्त्वपूर्ण अशा कार्यासाठी आता आपल्याला परिवहन प्राधिकरणाच्या आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

या सेवा पूर्वी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पुरविण्यात येत होत्या. यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये खूप चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता या सेवा ऑनलाईन पद्धतीने करता येत असल्यामुळे आपला वेळ तसेच पैसा वाचणार आहे. तसेच आता यामध्ये वाहन परवाना, कंडक्टर लायसन्स, परमिट आणि मालकी हस्तांतरण या सारख्या सेवांचा देखील समावेश करण्यात आला आहे. परिवहन प्राधिकरणामार्फत घेण्यात आलेल्या या महत्वपूर्ण अशा निर्णयामुळे आता आपण ड्रायव्हिंग लायसन्स बसल्या काढू शकतो.

आधार अधिकार सेवेमार्फत नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे. संबंधित मंत्रालयाने काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी या सेवांबाबत माहिती दिली. त्यानुसार, कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस या सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल. तर आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होईल. या ऑनलाईन सेवांमध्ये शिकाऊ परवान्यासाठी अर्ज, शिकाऊ परवान्यात पत्ता, नाव, फोटो बदलणे, डुप्लीकेट लर्नर लायसन्ससाठी अर्ज करणे आदी सेवांचा समावेश आहे.

आता परिवहन विभागाच्या ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित या गोष्टींसाठी अर्ज करायचा असेल ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या मध्ये अर्जदार हा ऑनलाईन अर्ज करणे, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. त्या करिता आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज केल्या नंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे पोस्टाने आपल्या घरी पाठवले जाईल.

Road And Transport Department RTO 58 Online Services
Union Government MORTH

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मधुमेहींना केंद्र सरकारचा गोड दिलासा; आता औषधे या दरात मिळणार

Next Post

आता संजूबाबा पण साऊथच्या चित्रपटात; एवढे घेतले मानधन

India Darpan

Next Post
Sanjay Dutt

आता संजूबाबा पण साऊथच्या चित्रपटात; एवढे घेतले मानधन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011