मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्न सोहळ्याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. पण याच दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, ती ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. वास्तविक, रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोघेही आधीच विवाहित आहेत. दोघांनी अडीच वर्षांपूर्वी कायदेशीर विवाह केला. दोघांनी २ ते अडीच वर्षांपूर्वी लग्नाची नोंदणी केली होती. सध्या दोघेही मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेशन करत आहेत.
दोघांनाही त्यांचे नाते सध्या कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायचे आहे. याआधी २९ सप्टेंबर रोजी अली आणि ऋचाने एक ऑडिओ रेकॉर्डिंग जारी केले होते, ज्यामध्ये दोघांनी २०२० मध्येच औपचारिकपणे सोहळा करणार होते. परंतु कोविडमुळे हे सेलिब्रेशन थोडे थांबवावे लागले होते. रिचा म्हणते की, ‘दोन वर्षांपूर्वी कोविड झाला तेव्हा आम्ही आमचे युनियन करणार होतो. त्यानंतर अली म्हणतो की, संपूर्ण जगाप्रमाणे आपलेही एकामागून एक वैयक्तिक नुकसान झाले आहे. यानंतर दोघेही सांगतात की आता आम्ही एकत्र एन्जॉय करणार आहोत. आम्ही कुटुंब आणि मित्रांसह साजरा करत आहोत. आम्हाला प्रेम मिळत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.
मुंबईत ग्रँड रिसेप्शन
या दोघांनी लग्नाचे सर्व विधी दिल्लीत पार पाडले आणि आता मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. रिसेप्शनला अनेक सेलेब्स येणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत आयुष्मान खुराना, विकी कौशल, विद्या बालन, हुमा कुरेशी, करण जोहर, संजय दत्त आणि तापसी पन्नू देखील आहेत. दोघांच्या लग्नाबाबत प्रवक्त्याने सांगितले की, दोघांना पंजाबी आणि लखनवी पद्धतीने साजरे करायचे आहेत. दोघांचे कपडेही त्यानुसार डिझाइन केले होते. रिचाच्या एका साडीची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये तिची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.
दोघांची प्रेमकथा
२०१२ मध्ये अली आणि रिचा यांची भेट फुक्रे चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघेही आधी चांगले मित्र बनले आणि नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अलीने २०१९ मध्ये रिचाला लग्नासाठी प्रपोज केले. लग्नाआधी दोघांनी फुक्रे ३ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि आता या चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Richa Chaddha Ali Fazal Wedding Ceremony
Entertainment Bollywood