पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट बरोबरच असे पाच अॅप्स आहेत जेथे तुम्ही खरेदी करुन बंपर डिस्काऊंट मिळवू शकतात. त्याचीच माहिती आपण आज करुन घेऊ..
कॅशकारो
कॅशकारोने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बीग बझार, फ्लिपकार्ट, अमेजन, जयबांग, मयंत्रा आणि ५०० हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. तुम्हाला ५ टक्के ते १० टक्के अतिरिक्त कॅशबॅक किंवा रिवॉर्ड जिंकता येतील. २५० रुपये किंवा त्याहून अधिक कॅशबॅक मिळाल्यानंतर तुम्ही ते तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.
कूपन दुनिया
कूपन दुनियाने सर्वोत्तम ऑफर आणि सूट देण्यासाठी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मेकमायट्रिप, पेटिएम, बुक मायशो आणि अन्य काही यांसारख्या २ हजाराहून अधिक ऑनलाइन ब्रँडसह भागीदारी केली आहे, येथे तुम्हाला २ ते १२ टक्के अतिरिक्त कॅशबॅक किंवा रिवॉर्ड मिळवण्याची संधी मिळते. तुमच्याकडे २५० रुपये किंवा त्याहून अधिक कॅशबॅक मिळाल्यावर ते तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकता. आपण मोबाईल रिचार्जसाठी वापरू शकता. पेटीएम वॉलेटमध्ये लोड करू शकता किंवा फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन व्हाउचर म्हणून रिडीम करू शकता.
गोपैसा
गोपैसा ने प्रोमो कोड, कूपन आणि कॅशबॅक ऑफर देण्यासाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट, जयबांग, लेंसकार्ट, मेकमायट्रिप, टाटा क्लिक, यात्रा यांसारख्या १ हजारहून अधिक ऑनलाइन ब्रँडसह भागीदारी केली आहे. आपल्याला २ ते १५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक किंवा रिवॉर्ड मिळवण्याची संधी मिळते. कॅशबॅक रक्कम प्रीपेड मोबाईल नंबर किंवा डीटीएच कनेक्शन रिचार्ज करण्यासाठी आपण वापरू शकता किंवा वीज, पाणी इ. बिले भरू शकता आणि भागीदार वेबसाइटवर पेमेंट करू शकता. तसेच, बँक खाते हस्तांतरणाचा पर्याय आहे.
लाफलाफा
लाफलाफा हे मोबाइल अॅप कूपन आणि कॅशबॅक एग्रीगेटर आहे. हे अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मायंत्रा, Firstcry इत्यादींसह ५०० हून अधिक व्यापाऱ्यांसाठी कूपन ऑफर करते. तुम्ही सहभागी व्यापाऱ्यांकडून ५० टक्के कॅशबॅक मिळवू शकता.
झिंगोय
अमेझॉन, फ्लिपकार्ट, अजिओ, क्रोमो, फार्मसी इत्यादी १ हजारांहून अधिक नोंदणीकृत व्यापार्यांकडून दैनंदिन खरेदी आणि विशेष विक्रीवर कॅशबॅक ऑफर करते. तुम्हाला सहभागी व्यापाऱ्यांकडून सुमारे २९ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. तसेच रेफरल साइन अप करेल आणि खरेदी करेल तेव्हा तुम्हाला पेबॅक देखील मिळेल. २५० रुपयांच्या किमान मर्यादेचा वैध कॅशबॅक असेल. व्हाउचरमधून मिळालेल्या कॅशबॅकवर इतर कोणत्याही उत्पन्नाप्रमाणे दावा केला जाऊ शकतो.