इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये धर्मांतरावरून मोठा गदारोळ झाला. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी जमावाने एका चर्चची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यात नारायणपूरचे पोलिस अधिक्षक सदानंद कुमार यांचे डोके फुटले. तर, स्टेशन प्रभारींसह अनेक पोलीस कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले आहेत. जखमी स्टेशन प्रभारी यांना जगदलपूरला उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एडका ग्रामपंचायतीच्या गोरा गावात रविवारी ख्रिश्चन मिशनरी लोकांची सभा सुरू होती. यादरम्यान त्यांचा आदिवासींसोबत धर्मांतरावरून वाद झाला. यादरम्यान जोरदार हाणामारी झाली. पोलीस आले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. याबाबत सोमवारी आदिवासी समाजाकडून बंद पुकारण्यात आला. सुरक्षा व्यवस्थेत सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिक्षक आणि जिल्हधिकारीही उपस्थित होते.
https://twitter.com/jptripathi2007/status/1609869820996247552?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
अचानक जमाव संतप्त झाला आणि त्यांनी थेट चर्चवर हल्ला केला. त्यांनी तेथे तोडफोड सुरू केली. हे पाहून पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर जमावाने त्यांच्यावरही हल्ला केला. दगडफेक आणि लाठ्या-काठ्यांनी जमावाने हल्ला सुरू केला. यात पोलिस अधिक्षक सदानंद कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्या डोक्याला टाके घालण्यात आले.
त्याचबरोबर अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. त्यांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आपत्कालीन फोर्स घटनास्थळी दाखल झाला आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी हेही नारायणपूरला रवाना झाले आहेत. सध्या परिसरात परिस्थिती सामान्य आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर दुसरीकडे आदिवासींनी धर्मांतराचा आरोप केला आहे.
https://twitter.com/chauchakmedia/status/1609869354673524737?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
Religious Conversion Mob Attack on Police Video
Church Narayanpur Bastar SP Injured Christian Hindu Trible
Rural Village