India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

समुद्र किनारी दोन हेलिकॉप्टरची टक्कर; ४ ठार, अनेक जखमी (Video)

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली. क्वीन्सलँडचे पोलिस निरीक्षक गॅरी वॉरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कोस्टवरील मेनबीचवरून जात असताना दोन्ही हेलिकॉप्टरची टक्कर झाली. समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मात्र, बचाव पथक आणि डॉक्टर कसेतरी तिथे पोहोचले. देशाच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोल्ड कोस्टमध्ये सुट्टीच्या दिवसात मोठी गर्दी असते.

क्वीन्सलँड रुग्णवाहिका सेवा (क्यूएएस) च्या जेनी शेरमनच्या म्हणण्यानुसार, दोन हेलिकॉप्टरमध्ये १३ जण होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला, तीन गंभीर जखमी झाले आणि सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. ज्यात काचेचे तुकडे झाले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये वाळूवर हेलिकॉप्टरचे अवशेष पडलेले, जमिनीवर कर्मचारी आणि आजूबाजूच्या पाण्यात अनेक जहाजे असल्याचे दिसून आले. वॉरेल म्हणाले की, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की एक हेलिकॉप्टर उड्डाण करत होते आणि दुसरे लँडिंग करत होते. त्याचवेळी या हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे.

एका हेलिकॉप्टरची विंडस्क्रीन काढून टाकण्यात आली असून ते बेटावर सुरक्षितपणे उतरले आहे. दुसरे (हेलिकॉप्टर) क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला आहे. ते पुढे म्हणाले की, अपघातानंतर जवळपासचे पोलीस आणि लोक हेलिकॉप्टरमधील लोकांना बाहेर काढण्याचा आणि प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न करत होते.

#BREAKING

Helicopter crash outside #SeaWorld on the #GoldCoast. Possibly two helicopters collided.

It’s bad. 😰 pic.twitter.com/K3YYyxXWum

— Jet Ski Bandit (@fulovitboss) January 2, 2023

Australia Two Helicopters Collide at Sea Coast 4 Death


Previous Post

संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता परिसरातील बांधकामांना बंदी; बघा, काय आहे नियम?

Next Post

धर्मांतरावरुन मोठा गदारोळ! संतप्त नागरिकांनी थेट पोलिस अधिक्षकांचेच डोके फोडले (व्हिडिओ)

Next Post

धर्मांतरावरुन मोठा गदारोळ! संतप्त नागरिकांनी थेट पोलिस अधिक्षकांचेच डोके फोडले (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group