India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रिलायन्स जिओची 5G सेवा राज्यातील या दोन शहरांमध्येही; अशी आहे ऑफर

India Darpan by India Darpan
March 21, 2023
in राष्ट्रीय
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स जिओने विदर्भातील भंडारा आणि वर्धा ही दोन शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडली आहेत. याच वेळी 16 राज्यातील 41 शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडली गेली. तसेच 5G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या आता 406 झाली आहे. वर्धा आणि भंडारा व्यतिरिक्त जिओ ची ट्रू 5G सेवा पुणे, नागपुर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी,अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, मालेगाव, चाकण, सोलापूर, बीड, परभणी, लातूर, अहमदनगर येथे उपलब्ध आहे.

याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “वर्धा आणि भांडाऱ्यामध्ये मध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून या दोन्ही शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह विदर्भ आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”

आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल. जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू 5G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.

जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल

Reliance Jio True 5G Service Start in Maharashtra 2 Cities


Previous Post

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामांबाबत बांधकाम मंत्र्यांनी दिले हे निर्देश

Next Post

आदित्य ठाकरेंचे लग्न आणि तोंडाला कुलूप! सभागृहात असा रंगला हास्यकल्लोळ…. फडणवीसांनी अशी घेतली फिरकी

Next Post

आदित्य ठाकरेंचे लग्न आणि तोंडाला कुलूप! सभागृहात असा रंगला हास्यकल्लोळ.... फडणवीसांनी अशी घेतली फिरकी

ताज्या बातम्या

सिडकोत एकाला इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध पडला महागात, साडे अठरा लाखाला गंडा

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पैशांसाठी मुलाने आईवर प्राणघातक हल्ला, आई गंभीर जखमी

September 29, 2023
crime

वाहनचोरीची मालिका सुरू; वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकली चोरीला

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग, तीन जणांवर गुन्हा दाखल

September 29, 2023

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॅाम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी

September 29, 2023

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट… तब्बल १३ जणांचा मृत्यू…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group