मुंबई – रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असते. आता जिओने ग्राहकांना एक आनंदवार्ता दिली आहे. कंपनीने एक जबरदस्त सेवा सादर केली आहे. या सेवेद्वारे ग्राहक इंस्टंट मोबाईल डाटा मिळवू शकतात. त्याचे पैसे ते नंतर अदा करू शकतात. प्रीपेड ग्राहकांची दररोजच्या डाटाची मर्यादा संपल्यानंतर ग्राहक कंपनीकडून डाटासाठी कर्ज घेऊ शकतात, या सेवेचे नाव इमर्जेंन्सी डाटा लोन (Emergency Data Loan) असे देण्यात आले आहे.
‘रिजार्ज नाऊ अँड पे लेटर’ म्हणजे काय
देशात प्रथमच एखाद्या दूरसंचार कंपनीने डाटा लोनची सुविधा सुरू केली आहे. ‘रिचार्ज नाऊ अँड पे लेटर’ च्या धर्तीवर आधी ग्राहक आपल्या आवश्यकतेनुसार डाटा लोन घेऊ शकतात. नंतर त्याचे पैसे अदा करू शकतात. डाटा लोनसाठी ग्राहकांकडे कोणताही अॅक्टिव्ह प्लॅन सुरू असणे आवश्यक आहे. ग्राहकांचा अॅक्टिव्ह प्लॅन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल. म्हणजेच ग्राहका जर ५ पॅक डाटा लोन घेणार असेल तर त्याची व्हॅलिडिटी प्लॅन अॅक्टिव्ह असेलपर्यंत राहील.
५GB पर्यंत डाटा लोन घेणे शक्य
डाटा लोन १GB पॅकमध्ये उपलब्ध असेल. डाटा लोन पॅक ११ रुपये प्रतिपॅक म्हणजेच ११ रुपये प्रति जीबीच्या किमतीवर ग्राहकांना मिळणार आहे. प्रत्येक ग्राहकाला एकूण ५ पॅक म्हणजेच ५GB पर्यंत डाटा लोन घेऊ शकता येणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील ही क्रांतिकारक नावीन्यपूर्ण कल्पना आहे.
१GB पॅकसोबत हायस्पीड डाटा
प्रीपेड कनेक्शन वापरणार्या अनेक ग्राहकांच्या दररोजच्या डाटाची मर्यादा संपल्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे ते त्वरित डाटा टॉपअप करू शकत नाहीत. त्यामुळे ते त्या दिवशीच्या हाय स्पीड डाटापासून वंचित राहतात. ग्राहकांच्या सुविधेला लक्षात घेऊन आता जिओने १ GB पॅकमध्ये डाटा लोन देणे सुरू केले आहे.
असे घ्यावे डाटा लोन
१) MyJio अॅप उघडून पेजवरील डाव्या बाजूच्या मेन्यूवर जावे
२) मोबाईल सेवेंतर्गत इमर्जेंसी डाटा लोन निवडा
३ ) इमर्जेंसी डाटा लोन बॅनरवर क्लिक करावे
४) गेट इमर्जेंसी डाटा चा पर्याय निवडावा
५) इमर्जेंसी डाटा लोन घेण्यासाठी अॅक्टिव्ह नाऊ वर क्लिक करावे.