मुंबई – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना पार्ट टाईम राजकारणात अपयशी ठरल्यामुळे फूल टाईम लॉबिंग सुरू केल्याचा टोमणा मारला आहे. अर्थात हेदेखील कोरोनाशी संबंधितच आहे. त्यामुळे देशात सर्व पक्ष कोरोनावरून राजकारण करण्यात कसे व्यस्त आहेत, हेच सिद्ध होते.
रविशंकर प्रसाद यांचे म्हणणे आहे की, विदेशी औषध कंपन्यांनी तयार केलेल्या लसीला भारतात मंजुरी मिळवून देण्यासाठी राहुल गांधी फूल्ल टाईम लॉबिंग करीत आहेत. यापूर्वी युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांची निर्मिती करणाऱ्या विदेशी कंपन्यांसाठीही राहुल गांधी यांनी लॉबिंग केले होते. रविशंकर प्रसाद यांच्या या आरोपांमुळे राजकारण चांगलेच पेटले आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीची निर्यात थांबविण्याची मागणी केली आहे. उलट नियम आणि कायद्यांमध्ये राहून इतर लसीला भारतात तातडीने मंजुरी देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येकाला लस मिळेल यासाठी सध्या ३५ हजार कोटी रुपयांच्या लसीची खरेदी दुप्पट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय खरेदी आणि वितरणात राज्य सरकारांची भूमिका आणि भागेदारी वाढविण्यात यावी, अशी मागणी राहुल यांनी केली आहे.
प्रत्येकाला मिळावी लस
देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारांना लस मिळविण्याचा आणि वितरणाचा अधिकार देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल लस का घेत नाहीत
राहुल गांधी हे लस का घेत नाहीत, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. की राहुल यांनी परदेशात जाऊन लस घेतली आहे, असा खोचक सवालही भाजपने केला आहे.
https://twitter.com/rsprasad/status/1380475321472847874