परदेशी लसीला मान्यता देण्यासाठी राहुल गांधींचे लॉबिंग; गंभीर आरोप

मुंबई – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहेत्यांनी राहुल गांधी यांना पार्ट टाईम राजकारणात अपयशी ठरल्यामुळे फूल टाईम लॉबिंग सुरू केल्याचा टोमणा मारला आहेअर्थात हेदेखील कोरोनाशी संबंधितच आहेत्यामुळे देशात सर्व पक्ष कोरोनावरून राजकारण करण्यात कसे व्यस्त आहेतहेच सिद्ध होते.
रविशंकर प्रसाद यांचे म्हणणे आहे कीविदेशी औषध कंपन्यांनी तयार केलेल्या लसीला भारतात मंजुरी मिळवून देण्यासाठी राहुल गांधी फूल्ल टाईम लॉबिंग करीत आहेतयापूर्वी युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांची निर्मिती करणाऱ्या विदेशी कंपन्यांसाठीही राहुल गांधी यांनी लॉबिंग केले होतेरविशंकर प्रसाद यांच्या या आरोपांमुळे राजकारण चांगलेच पेटले आहे
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीची निर्यात थांबविण्याची मागणी केली आहेउलट नियम आणि कायद्यांमध्ये राहून इतर लसीला भारतात तातडीने मंजुरी देण्यात यावीअसे त्यांनी म्हटले आहेप्रत्येकाला लस मिळेल यासाठी सध्या ३५ हजार कोटी रुपयांच्या लसीची खरेदी दुप्पट करावीअसेही त्यांनी म्हटले आहेशिवाय खरेदी आणि वितरणात राज्य सरकारांची भूमिका आणि भागेदारी वाढविण्यात यावीअशी मागणी राहुल यांनी केली आहे.
प्रत्येकाला मिळावी लस
देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवीअशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहेराज्य सरकारांना लस मिळविण्याचा आणि वितरणाचा अधिकार देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल लस का घेत नाहीत
राहुल गांधी हे लस का घेत नाहीत, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. की राहुल यांनी परदेशात जाऊन लस घेतली आहे, असा खोचक सवालही भाजपने केला आहे.