इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कलाकार हे खेळाच्या मैदानात नेहमीच दिसतात. आता तर आयपएलच्या निमित्ताने ते यात गुंतवणुकीच्या निमित्ताने सहभागी देखील होत आहेत. क्रिकेट सोबतच अन्य खेळांमध्येही या कलाकारांचा वाढता सहभाग आहे. ही सगळी चर्चा करण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ.
तसे तर दिवसाला हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात, मग यात स्पेशल काय, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. तर स्पेशल असं आहे की, यात ऐश्वर्या रॉय – बच्चन आणि रणवीर सिंग आहेत. आणि ऐश्वर्या त्याचे गाल ओढते आहे तर तो तिच्या हाताला किस करतो आहे. आणि हा प्रकार ऐश्वर्याची मुलगी आराध्या एकटक पाहते आहे.
यंदाचा प्रो कबड्डी लीगचा अंतिम सामना जयपूर पिंक पँथर्स आणि पुणेरी पलटन यांच्यामध्ये रंगला. यात जयपूर पिंक पँथर्स विजेते ठरले. या जयपूरच्या संघाचा मालक अभिषेक बच्चन हा आहे. त्यामुळे आपला संघ विजयी ठरल्यानंतर त्याने कुटुंबियांबरोबर स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. त्याचवेळी अभिनेता रणवीर सिंगही ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या अंतिम सामन्याला उपस्थित होता.
अभिषेकसह पत्नी ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या बच्चन स्टेडियममध्ये हजर होती. अभिषेकची टीम जिंकल्यानंतर अभिषेक व ऐश्वर्याने एकमेकांना घट्ट मिठी मारली. रणवीर स्टेडियममध्ये येताच त्याने ऐश्वर्याची भेट घेतली. यावेळी ऐश्वर्याने रणवीरचे गाल ओढले. ऐश्वर्याने रणवीरचे गाल ओढल्यानंतर त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोन्ही हातांना किस केलं. यावेळी आराध्या दोघांकडे एकटक बघत होती. ऐश्वर्या व रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
https://twitter.com/sidharth0800/status/1604428879988330496?s=20&t=dxlZUuYZqlw8t46dzw1_iw
Ranveer Singh Kiss to Aishwarya Rai Hand Video
Entertainment Video Viral Bollywood