India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘कांतारा’ आता थेट ऑस्करच्या शर्यतीत; प्रेक्षकांना लावले अक्षरशः वेड

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटसृष्टीत ‘ऑस्कर’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी नामांकित होणं हा देखील एक सन्मानच असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांना हा मान मिळाला आहे. यंदा ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने हा मान पटकावला आहे. रिषभ शेट्टी यांचा ‘कांतारा’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला. परिणामी या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.

‘कांतारा’ या चित्रपटासाठी तसेच त्यातल्या अभिनयासाठी रिषभ शेट्टींचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा असा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांनी देखील त्याला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना वेगळा विचार करण्यास भाग पडलं. चित्रपटगृहानंतर आता ओटीटीवरही हा चित्रपट लोकप्रिय होतो आहे. मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांनी इतर भाषांमध्ये देखील हा चित्रपट आणला. कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची भलतीच वाहवा झाली.

होम्बले प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या संस्थेचे संस्थापक विजय किरांगदुर यांनी सांगितले की, ”‘कांतारा’ या चित्रपटाचं ऑस्करसाठी नॉमिनेशन व्हावं यासाठी आम्ही अर्ज केला आहे. अद्याप यावर निर्णय होणे बाकी आहे. असे असले तरीही हा चित्रपट त्याच्या कथेमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो, याची आम्हाला खात्री असल्याचेही, त्यांनी म्हटले आहे. ‘कांतारा’ हा कन्नड भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘रहस्यमयी जंगल’ असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे.

Kantara Movie Oscar Nomination Application
Entertainment


Previous Post

रणवीरने केलं ऐश्वर्याच्या हाताला किस; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

नाना पाटेकर, अमिताभ यांच्या आवाजात उलगडणार नागपूरचा इतिहास; असे आहे ‘म्युझिकल फाऊंटन शो’

Next Post

नाना पाटेकर, अमिताभ यांच्या आवाजात उलगडणार नागपूरचा इतिहास; असे आहे ‘म्युझिकल फाऊंटन शो’

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group