India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रेल्वे स्टेशनच्या टॉयलेट वापरासाठीही आता द्यावा लागणार GST; एका पर्यटकाने मोजले चक्क ११२ रुपये!

India Darpan by India Darpan
September 5, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रवासी हे अनेकदा प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या शौचालयाचा वापर करत असतात. यासाठी ५ ते १० रुपये शुल्कदेखील आकारले जात असते, इतकंच आपल्याला माहित आहे. मात्र भारतातल्या एका रेल्वे स्थानकावर शौचालय वापरण्यासाठी चक्क ११२ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. खास म्हणजे त्यात १२ टक्के जीएसटीचा समावेश आहे.

आग्रा कँट स्टेशनवरील एक्झिक्युटिव्ह लाउंजचे शौचालय काही मिनिटांसाठी तब्बल ११२ रुपये शुक्ल घेण्यात आले. दिल्लीच्या ब्रिटीश दूतावासातून आलेल्या दोन पर्यटकांना प्रत्येकी ११२ म्हणजेच एकूण २२४ रुपये मोजावे लागले. विशेष म्हणजे या शुल्कात जीएसटीचा देखील समावेश आहे. शौचालय वापरासाठी आकारलेल्या शुल्कात ६ टक्के एसजीएसटी आणि ६ टक्के सीजीएसटी समाविष्ट आहे. म्हणजेच शौचाला जाण्यासाठी १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये शौचालयात जाणेदेखील एखाद्यासाठी इतके महागडे ठरले.

शौचालय वापरण्यासाठी पर्यटकांकडून आकारलेल्या या शुल्काचे प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी यात आयआरसीटीसीचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले. हे विश्रामगृह एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये राहण्यासाठी ५० टक्के सूट दिल्यानंतर किमान ११२ रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे. आयआरसीटीसीनुसार, पैसे भरल्यानंतर तिथे मोफत कॉफी दिली जाते. यामध्ये प्रवाशाला शौचालयाचा वापर, मोफत वायफाय आणि एसी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये २ तासांपर्यंत थांबण्याची व्यवस्था आहे.

सेवा शुल्कामुळे आयआरसीटीसी अनेकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये एका व्यक्तीकडून २० रुपयांच्या कपवर ५० रुपये सर्व्हिस चार्ज घेतला होता. त्या व्यक्तीला एका कप चहासाठी ७० रुपये मोजावे लागले होते. रेल्वेच्या या ‘हायफाय’ सेवेचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीने चहाचे बिल सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यानंतर रेल्वेला स्पष्टीकरण म्हणून आपली बाजू मांडावी लागली होती.

Railway Station Toilet Use GST Service Charge
Agra Cantt Washroom


Previous Post

एकनाथ शिंदेंना सतावते आहे ही चिंता; अखेर शिवसैनिकांसाठी घेतला हा मोठा निर्णय

Next Post

सप्तशृंगी देवी भक्तांसाठी खुशखबर! या तारखेपासून मंदिरात पुन्हा दर्शन घेता येणार

Next Post

सप्तशृंगी देवी भक्तांसाठी खुशखबर! या तारखेपासून मंदिरात पुन्हा दर्शन घेता येणार

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group