बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईसह या ३ रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटणार; १० हजार कोटींची गुंतवणूक होणार

by India Darpan
सप्टेंबर 28, 2022 | 4:10 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज तीन मोठे निर्णय घेतले. त्यात रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचाही समावेश आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पात सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय देशातील १९९ प्लॅटफॉर्मच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे.

रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांच्या एकत्रीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची जागा विकसित करण्यात येणार आहे. स्थानकाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

असे आहे सरकारचे नियोजन
केंद्र सरकार रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन प्रमुख रेल्वे स्थानकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बस, ऑटो आणि मेट्रो रेल्वे सेवांसोबत रेल्वे सेवा एकत्रित केल्या जातील. त्याच वेळी, अहमदाबाद रेल्वे स्थानकाची पुनर्रचना मोडेराच्या सूर्य मंदिरापासून प्रेरित आहे. मुंबईतील हेरिटेज इमारतीला हात लावला जाणार नसून, आजूबाजूच्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे.

Dear Mumbaikars,
This is how our Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT Railway Station will be in future!
Thank you Hon @narendramodi ji for the Union #CabinetDecision for the grand and futuristic redevelopment plan, which will bring huge ease in travel and logistics!#Mumbai pic.twitter.com/c1XjvGqvAq

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 28, 2022

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) योजना पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केंद्राने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या ३८ टक्के महागाई भत्त्यामध्ये नवीनतम वाढ होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. देशातील एकूण १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या दिशेने टप्प्या-टप्प्याने कार्य सुरु आहे. यातील ४७ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यासाठी निविदा मागविण्यात आल्याअसून ३२ रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास कार्य प्रगतीवर आहे.

रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यांतर्गत रेल्वे स्थानकावर खाद्य व वस्तू विक्रेत्यांसाठीची जागा, कॅफ्रेटेरिया, मनोरजंन सुविधांसह प्रवाशांना बसण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. फुड कोर्ट, प्रतिक्षालय, मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक वस्तूंच्या खरेदीची जागा, सीटी सेंटर उभारणे आदी बाबींचा यात समावेश आहे.

?LIVE Now?#Cabinet briefing by Union Ministers @AshwiniVaishnaw and @ianuragthakur at National Media Centre, New Delhi

Watch on #PIB's?
Facebook: https://t.co/ykJcYlNrjj
YouTube: https://t.co/DwzSpczXPc

https://t.co/JiQDi5eurd

— PIB India (@PIB_India) September 28, 2022

Railway Station Redevelopment Cabinet Decision

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थकबाकी भरा अन्यथा… टॉप १५० थकबाकीदारांना जिल्हा बँकेचा सज्जड दम

Next Post

सप्तशृंगीगडावर तिसऱ्या माळेला भाविकांची मांदियाळी; ३० हजार भाविकांनी घेतले दर्शन

India Darpan

Next Post
IMG 20220928 WA0035 1 e1664361638394

सप्तशृंगीगडावर तिसऱ्या माळेला भाविकांची मांदियाळी; ३० हजार भाविकांनी घेतले दर्शन

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011