इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तिकीट काढून रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे पैसे देणार असल्याचे कुणे सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. नवी दिल्लीहून लखनऊला येणारी तेजस एक्सप्रेस उशिरा आली. त्यामुळे नियमांनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) प्रवाशांना 250 रुपयांची भरपाई देणार आहे. IRCTC कडून ५४४ प्रवाशांना एकूण 1.36 लाख रुपये परत करणार आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशात धुक्यामुळे कॉर्पोरेट ट्रेन तेजस एक्स्प्रेसला शुक्रवारी दोन तास उशीर झाला. या ट्रेनच्या विलंबाची भरपाई IRCTC प्रवाशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी तेजस एक्सप्रेस अलिगड आणि गाझियाबाद दरम्यान धुक्यात अडकली होती. यामुळे ही ट्रेन 12:25 ऐवजी 2:19 वाजता नवी दिल्लीला पोहोचली. परतीच्या दिशेने तेजस एक्स्प्रेस नवी दिल्लीहून दुपारी 4.59 वाजता सुटते. ही ट्रेन 1.19 तासांच्या विलंबाने नवी दिल्लीहून निघाली. पण कानपूरला पोहोचेपर्यंत 2:44 तासांनी आणि लखनऊ जंक्शनला रात्री 12:55 ला 2:50 तास उशीर झाला.
नवी दिल्लीहून लखनऊला येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये 544 प्रवासी प्रवास करत होते. नियमांनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) प्रवाशांना 250 रुपये भरपाई देईल. IRCTC या प्रवाशांना 1.36 लाख रुपये परत करेल. लखनऊमध्ये उशिरा पोहोचल्यामुळे तेजस एक्स्प्रेस शनिवारी सकाळी एक तास उशिराने नवी दिल्ली सोडू शकते. याशिवाय, शनिवारी सकाळी लखनऊमध्ये 1 तास10 मिनिटांनी, नवी दिल्ली लखनऊ एसी सुपरफास्ट एक तास, चंदीगड-लखनऊ सुपरफास्ट बरेली ते लखनऊ दरम्यान 2 तास 35 मिनिटांनी उशीर झाला. दून एक्स्प्रेस दीड तास, बेगमपुरा एक्स्प्रेस दीड तास, कृषक एक्स्प्रेस एक तास उशिराने धावली.
दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. 26 तारखेला प्रजासत्ताक दिनाची परेड होणार आहे. रेल्वे बोर्डाने परेड दरम्यान आपल्या गाड्या थांबविण्याचे आदेश दिले आहेत. गाडी क्रमांक 12204 अमृतसर – सहरसा गरीबरथ एक्स्प्रेस, 20506 नवी दिल्ली – दिब्रुगढ टाउन राजधानी एक्सप्रेस, 20504 नवी दिल्ली – दिब्रुगढ टाउन राजधानी एक्सप्रेस, 15128 नवी दिल्ली-वाराणसी काशी विश्वनाथ एक्सप्रेस, 12423 दिब्रुगढ, दिब्रुगड टाउन राजधानी एक्सप्रेस एक्सप्रेस, 12523 न्यूजलपाईगुडी – नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस थांबवली जाईल.