India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्टेशन मास्तरशी भांडण झालं…. गेटमननं रुळावरच लाल झेंडा लावला… तब्बल ४८ मिनिटे अनेक रेल्वे खोळंबल्या (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये स्टेशन मास्तर आणि रेल्वे गेटमन यांच्यात झालेल्या भांडणाने आज चांगलीच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या गेटमनने रेल्वे रुळावर लाल झेंडा लावून थेट राजधानी एक्सप्रेसच थांबवली. लखनौ-बरेली मार्गावर तोंडरपूरजवळ हा सर्व प्रकार घडला. स्टेशन मास्तर आणि गेटमन यांच्यातील भांडणात तब्बल ४८ मिनिटांनी हा रेल्वे मार्ग प्रभावित झाला. अनेक गाड्याही थांबल्या. ट्रेन थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गेटमनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे.

तोडरपूर स्टेशन अंतर्गत सराय खास रेल्वे गेटवर तैनात असलेल्या गेटमन सुनील कुमारच्या म्हणण्यानुसार, स्टेशन मास्टर विशाल वर्मा त्याला दोन वर्षांपासून त्रास देत होता. याबाबत त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या वैमनस्यातून शनिवारी स्टेशन मास्तरने गेटची तोडफोड केली. थांबल्यावर त्याच्यावर गोळीबार केला. जीव वाचवून गेटमनने पळ काढला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.

बराच वेळ थांबूनही कोणी न आल्याने त्यांनी ट्रॅकवर लाल झेंडा लावून अप आणि डाऊन मार्ग थांबवला. लाल झेंडा पाहून समोरून येणाऱ्या राजधानी, अवध आसाम एक्स्प्रेसच्या चालकांनी गाड्या थांबवल्या. स्टेशन मास्तरवर कारवाई न केल्यास येथे गाड्या उभ्या राहतील, अशी धमकी गेटमनने पोलिसांना दिली. जर कोणी जबरदस्ती केली तर आत्महत्या करेल, असेही तो म्हणाला. माहिती मिळताच रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन मार्ग मोकळा करून दिला. सुमारे ४८ मिनिटांनी गाड्या पुढे निघाल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अजय नंदन यांनी सांगितले की, स्टेशन मास्टर तोडरपूर विशाल वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

#Hardoi स्टेशन मास्टर गेटमैन के बीच हुए आपसी विवाद में चली गोली, स्टेशन मास्टर ने गेटमैन पर झोंका फायर, हादसे में बाल-बाल बचा गेटमैन, नाराज गेटमैन ने अप व डाउन ट्रैक पर रोक दी ट्रेनें, टोडरपुर स्टेशन मास्टर एक गेटमैन के बीच हुआ विवाद, मौके पर पहुंची पुलिस ने ट्रैक को कराया चालू pic.twitter.com/ClxLmTiSVu

— Khanzar Sutra 'खंजर सूत्र' (@khanzarsutra) September 10, 2022

Railway Gateman Station Master Fight Train Delay


Previous Post

बाप रे! सलूनमध्ये अचानक झाला हेअर ड्रायरचा स्फोट (बघा, थरारक व्हिडिओ)

Next Post

औरंगाबादमध्ये शिक्षक आमदार व संघटना एकवटल्या; या कारणासाठी रविवारी आत्मसन्मान रॅली

Next Post

औरंगाबादमध्ये शिक्षक आमदार व संघटना एकवटल्या; या कारणासाठी रविवारी आत्मसन्मान रॅली

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group