इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये स्टेशन मास्तर आणि रेल्वे गेटमन यांच्यात झालेल्या भांडणाने आज चांगलीच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या गेटमनने रेल्वे रुळावर लाल झेंडा लावून थेट राजधानी एक्सप्रेसच थांबवली. लखनौ-बरेली मार्गावर तोंडरपूरजवळ हा सर्व प्रकार घडला. स्टेशन मास्तर आणि गेटमन यांच्यातील भांडणात तब्बल ४८ मिनिटांनी हा रेल्वे मार्ग प्रभावित झाला. अनेक गाड्याही थांबल्या. ट्रेन थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गेटमनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे.
तोडरपूर स्टेशन अंतर्गत सराय खास रेल्वे गेटवर तैनात असलेल्या गेटमन सुनील कुमारच्या म्हणण्यानुसार, स्टेशन मास्टर विशाल वर्मा त्याला दोन वर्षांपासून त्रास देत होता. याबाबत त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या वैमनस्यातून शनिवारी स्टेशन मास्तरने गेटची तोडफोड केली. थांबल्यावर त्याच्यावर गोळीबार केला. जीव वाचवून गेटमनने पळ काढला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.
बराच वेळ थांबूनही कोणी न आल्याने त्यांनी ट्रॅकवर लाल झेंडा लावून अप आणि डाऊन मार्ग थांबवला. लाल झेंडा पाहून समोरून येणाऱ्या राजधानी, अवध आसाम एक्स्प्रेसच्या चालकांनी गाड्या थांबवल्या. स्टेशन मास्तरवर कारवाई न केल्यास येथे गाड्या उभ्या राहतील, अशी धमकी गेटमनने पोलिसांना दिली. जर कोणी जबरदस्ती केली तर आत्महत्या करेल, असेही तो म्हणाला. माहिती मिळताच रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन मार्ग मोकळा करून दिला. सुमारे ४८ मिनिटांनी गाड्या पुढे निघाल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अजय नंदन यांनी सांगितले की, स्टेशन मास्टर तोडरपूर विशाल वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
https://twitter.com/khanzarsutra/status/1568597547559849985?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
Railway Gateman Station Master Fight Train Delay