मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल चोरी करणा-या मालेगाव येथील एका चोरट्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले आहे. मनमाड ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून हा चोर चोरी करत असे. या चोराला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सहा मोबाईल व एका पर्स हस्तगत केली आहे. लोहमार्ग पोलिस व आरपीएफ गस्त घालत असतांना एका विधीसंघर्षीत बालकासह हा चोर सापडला. या चोराने धावत्या रेल्वेत चोरी केल्याची कबुली दिली आहे.