नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन आहे. आजच्याच दिवशी १९९१मध्ये तामिळनाडूमध्ये राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते, त्यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत पंतप्रधानपद भूषवले.
राजीव गांधींच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण गांधी परिवार दिल्लीच्या वीर भूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळीच पोहोचला. राजीव यांच्या पत्नी तथा माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियंका गांधी-वड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही श्रद्धांजली वाहिली.
आजच्या स्मृती दिनानिमित्त राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. पापा, आप मेरे साथ ही है, एक प्रेरणा के रुप में, यादों में, सदा या ओळी लिहून त्यांनी राजीव गांधी यांच्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. या व्हिडिओ काहीच वेळात खुप व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1660119248318996482?s=20
Rahul Gandhi Share Emotional Video of Rajiv Gandhi