शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ही लोकशाही आहे का? राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न आणि भाषणाचा काही भाग वगळला; नियम काय सांगतो?

फेब्रुवारी 11, 2023 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
FoWlqRPacAAdS0g e1676037069348

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दोन्हा सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. राष्ट्रतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस खासगार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढविला. या भाषणातील काही भाग वगळला गेल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारावरून राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. सोबतच पंतप्रधान आरोपांना उत्तर देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदाणी यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांवर टीकास्र सोडले होते. या भाषणातला काही भाग रेकॉर्डवर येऊ नये, म्हणून वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक झाले आहेत. माझ्या भाषणातले शब्द का वगळण्यात आले? माझ्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर का देत नाहीत? गौतम अदाणींना का वाचविले जात आहे?, असे सवाल राहुल गांधींनी माध्यमांसोबत बोलताना उपस्थित केले.

भाषणातील भाग वगळणे म्हणजे काय?
एखाद्या सदस्याच्या भाषणाचा भाग रेकॉर्डमधून काढून टाकणे ही नियमित प्रक्रिया आहे. सभागृहाचे अध्यक्ष यासंदर्भातला निर्णय घेऊ शकतात. लोकसभेच्या नियम ३८० नुसार, सदस्याने वापरलेले शब्द हे अपमानजनक, आक्षेपार्ह किंवा असंसदीय असल्याचे अध्यक्षांना वाटले तर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश देऊ शकतात. नियमा ३८१ नुसार, सभागृह अध्यक्षांनी जो भाग कामकाजातून वगळण्याचे आदेश दिलेले असतात, असा भाग तिथून वगळून त्या ठिकाणी ‘सभा अध्यक्षांच्या आदेशानुसार वगळण्यात आले’, अशी तळटीप नमूद केली जाते.

शब्द वगळल्यानंतर पुढे काय?
कोणताही शब्द किंवा संदर्भ संसदीय कामकाजातून वगळल्यानंतर तो कामकाजाच्या नोंदीतून पूर्णपणे काढून टाकला जातो. वृत्तसंस्थांसह कुणालाही तो शब्द कामकाजाच्या वार्तांकनासाठी वापरता येत नाही. असंसदीय शब्द थेट प्रक्षेपणात आला असला, तरी तो कामकाजातून काढला जातो. कामकाजाच्या ऑडिओ रेकॉर्डिंमध्ये त्या शब्दाच्या ठिकाणी ‘बीप’ टाकला जातो.

Rahul Gandhi Loksabha Speech Questions Removed Official

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गौतम अदानींभोवती कर्जाचा सापळा! डोक्यावर आहे एवढे जबरदस्त कर्ज, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Next Post

देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन; पंतप्रधान मोदींनी केले उदघाटन, अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
1140x570

देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन; पंतप्रधान मोदींनी केले उदघाटन, अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011