रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राहुल गांधी यांना धमक्या…काँग्रेस पक्ष आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

by India Darpan
सप्टेंबर 18, 2024 | 11:45 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 60

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीवीरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे पण, महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आज गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपच्या तालिबानी वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केले तर भाजपाचा खासदार अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे. महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे.

तीन दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडला अजून अटक झालेली नाही म्हणूनच अनिल बोंडेची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार अशी भाषा करतात तरी राज्यातील – देशातील पोलीस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलिस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार? असा प्रश्न केला आहे.

विरोधी पक्षनेते श्री. राहुलजी गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीवीरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे पण, महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष उद्या… pic.twitter.com/3kjkis8yxt

— Nana Patole (@NANA_PATOLE) September 18, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राचे इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा? शरद पवार गटाच्या या नेत्याचा आरोप

Next Post

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत झाली ही चर्चा….जागा वाटपाबाबत महायुतीची या तारखेला बैठक

India Darpan

Next Post
ajit pawar11

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत झाली ही चर्चा….जागा वाटपाबाबत महायुतीची या तारखेला बैठक

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011