India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुणे मेट्रोसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

India Darpan by India Darpan
May 17, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रो लाईन ३ हा महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प घोषीत केल्याने १८ जुलै २०१८ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये १०० टक्के वाढीव अतिरीक्त विकास शुल्काच्या थकबाकीचा प्रस्ताव या बैठकीत चर्चेला ठेवला होता. त्यावर या पाच वर्षांच्या काळातील वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच एप्रिल २०२३ पासून जे अतिरिक्त विकास शुल्क लावले जात आहे, ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय देता येईल काय हे तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. माफ केलेल्या वाढीव विकास शुल्काची रक्कम सुमारे ३३२ कोटी एवढी आहे.

यावेळी मोशी पुणे (पीआयईसीसी) येथील ६.५० एकर जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला विनामोबदला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा २० जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आली. यावेळी पुणे रिंग रोड प्रकल्प, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ व २३ गावांचा विकासनिधी त्याचबरोबर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २०२३ ची पीएमआरडीए क्षेत्रात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी १८८ कोटी एकवेळ देण्यास यावेळीमान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Pune PMRDA 1926 Crore Budget Sanction


Previous Post

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई… तब्बल २.२३ कोटीचे सोने जप्त; प्रवाशांकडे येथे सापडले

Next Post

चिंताजनक! LICने दिला जोराचा दणका; गुंतवणुकदारांचे वर्षभरात बुडाले तब्बल इतके हजार कोटी

Next Post

चिंताजनक! LICने दिला जोराचा दणका; गुंतवणुकदारांचे वर्षभरात बुडाले तब्बल इतके हजार कोटी

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रेल्वे अपघातात सरकारी भरपाईबरोबरच मिळतील इतके लाख… फक्त खर्च करा अवघे ३५ पैसे… अशी आहे प्रक्रिया

June 5, 2023

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार मोठा धमाका; काय शिजतंय शिंदे गटामध्ये?

June 5, 2023

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group