India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल घोषित; भाजपला जबरदस्त धोबीपछाड

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in मुख्य बातमी
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळविली होती. विसाव्या फेरीअखेरीस निकाल स्पष्ट झाला. त्यानुसार, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली. तर भाजपचे हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्याजागी ही पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना मतदारांची फारशी पसंती नसल्याचे दिसून आले. भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप पदाधिकारी, राज्यातील मंत्री यांच्या सभा व रोडशो आयोजित करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. ३२ वर्षे भाजपचा उमेदवार तिथे सतत विजयी होत होता. मात्र महाविकास आघाडी सरकार ज्यापद्धतीने पाडण्यात आले, देश आणि राज्यातील वाढती महागाई, राज्यातील राजकारण या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने पोटनिवडणूकद्वारे केला. @Jayant_R_Patil

— NCP (@NCPspeaks) March 2, 2023

जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्याचेच परिणाम आपल्याला मतदान यंत्रातून दिसून येत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट या महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या धंगेकर यांचा विजय झाला आहे. भाजपच्या गोटात आणि जिथे भाजपचे वर्चस्व आहे अशा भागातही धंगेकर यांना मतदारांची पसंती पहायला मिळाली.

ताज्या आकडेवारीनुसार मिळालेली मते अशी
रवींद्र धंगेकर – काँग्रेस -७२,५९९
हेमंत रासने – भाजप – ६१,७७१

कसब्यात पंजा!
काँग्रेसचे धंगेकर ११०४० मतांनी विजयी … #electionresults2023 #Byelection #कसबा_पोटनिवडणूक #कसब्यात_धंगेकरच pic.twitter.com/cCeIOTVtYe

— Shital Pawar (@iShitalPawar) March 2, 2023

Pune Kasaba By Poll Election Counting Current Update


Previous Post

कांदा व्यापा-याची लुट करणा-याला पोलिसांनी अहमदाबाद येथून घेतले ताब्यात

Next Post

चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागला; ‘राष्ट्रवादी’ला बंडखोरी नडली!

Next Post

चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागला; 'राष्ट्रवादी'ला बंडखोरी नडली!

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group