पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळविली होती. विसाव्या फेरीअखेरीस निकाल स्पष्ट झाला. त्यानुसार, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली. तर भाजपचे हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्याजागी ही पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना मतदारांची फारशी पसंती नसल्याचे दिसून आले. भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप पदाधिकारी, राज्यातील मंत्री यांच्या सभा व रोडशो आयोजित करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.
https://twitter.com/NCPspeaks/status/1631206510863720449?s=20
जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्याचेच परिणाम आपल्याला मतदान यंत्रातून दिसून येत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट या महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या धंगेकर यांचा विजय झाला आहे. भाजपच्या गोटात आणि जिथे भाजपचे वर्चस्व आहे अशा भागातही धंगेकर यांना मतदारांची पसंती पहायला मिळाली.
ताज्या आकडेवारीनुसार मिळालेली मते अशी
रवींद्र धंगेकर – काँग्रेस -७२,५९९
हेमंत रासने – भाजप – ६१,७७१
https://twitter.com/iShitalPawar/status/1631194867996168192?s=20
Pune Kasaba By Poll Election Counting Current Update