India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुणे जितोच्या १७व्या वर्धापनदिनानिमित्त उद्योगमंत्र्यांनी दिली ही ग्वाही

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in राज्य
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चॅप्टर (जितो) च्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार संकला, उपाध्यक्ष अशोक हिंगड, सुदर्शन बाफना, विनोद मांडक, मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड, मुख्य सचिव चेतन भंडारी, कोषाध्यक्ष किशोर ओसवाल, संचालक हितेश शहा आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, जैन समुदायाने उद्योग वाढविण्याबाबत चांगले कार्य केले आहे. दुबईमध्ये जागतिक पातळीवरील उद्योकांचे संमेलन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उद्योजकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. राज्यातील उद्योजकांनी परदेशातही उद्योग उभारावेत. उद्योजकांनी सामाजिक दायित्व निधीचा उपयोग समाज विकासाची कामे करण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जैन समाजातील चार संगठना एकत्र येऊन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आहे. हा आदर्श बाकीच्या समाजाने घेणे गरजेचे आहे. या संघटनेच्या माध्यमातून खूप चांगले कार्य होत आहे. महात्मा गांधीचे संदेश पुढे घेवून जातांना समाजामध्ये परिवर्तन करण्याचे चांगले कार्य करीत आहेत. यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार संकला यांनी संघटनेच्या उपक्रमाबददल माहिती दिली.

यावेळी मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यापारी मिलिंद फाडे, उद्योजक प्रकाश पारख, तरुण उद्योजक अजय मेहता, सामाजिक कार्यकर्ते आर. के. लुंकड, महिला उद्योजक सोनल बरमेचा, व्यावसायिक वर्धमान जैन, शिक्षणतज्ज्ञ सुभाष परमार आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Pune Jito 17th Anniversary Industry Minister


Previous Post

H3N2 विषाणूला घाबरु नका, पण हलगर्जीपणाही करु नका… बघा तज्ज्ञ काय म्हणताय…

Next Post

मध आणि मेण खरेदीच्या हमीभावात मोठी वाढ; असा आहे नवा दर

Next Post

मध आणि मेण खरेदीच्या हमीभावात मोठी वाढ; असा आहे नवा दर

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group