गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कल्याणी देशपांडेला न्यायालयाने दिली ही शिक्षा

by Gautam Sancheti
डिसेंबर 23, 2022 | 5:09 am
in राज्य
0
Capture 25

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील सर्वात कुख्यात सेक्स रॅकेटर कल्याणी उर्फ ​​जयश्री उर्फ ​​टीना उमेश देशपांडे (52) हिला पुण्यातील विशेष न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) च्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण असल्याचे समोर येत आहे.

कल्याणी ही सुमारे 90च्या दशकापासून पुण्यातील देह व्यापाराचा भाग होती, पण 2000 सालामध्ये तिचे नाव पुणे पोलिसांच्या नोंदीमध्ये आले. सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली कल्याणी पुण्यातील टॉप ‘दलाल’ बनली. तिच्यावर सुमारे 24 गुन्हे दाखल आहेत. रिपोर्ट्सनुसार, कल्याणीचे नेटवर्क अजय पाटील, शक्ती थापा, मंगेश रुद्राक्ष आणि राजू बंगाली यांसारख्या गुन्हेगारांपेक्षा खूप मोठे असल्याचे सांगितले जाते. तिच्या बंगल्यातून ‘व्हीनस एस्कॉर्ट्स’ नावाची एस्कॉर्ट एजन्सी चालवली जात होती. कल्याणीचा बंगला वेश्याव्यवसाय आणि गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध होता.

डिसेंबर 2007 मध्ये त्यांचे जवळचे सहकारी अनिल ढोले यांची याच बंगल्यात हत्या करण्यात आली होती. मुंबईतून वेश्याव्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी ढोले हा एजंट म्हणून काम करत असे. ढोलेच्या मृत्यूनंतर कल्याणीच्या कारवाया वाढल्या. तिने पुणे आणि इतर भागात वेश्याव्यवसायासाठी देश-विदेशातील मुलीं पुरवल्याचा केल्याचा आरोप आहे. कल्याणीने हॉटेलवाले आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट यांच्यात दलाली करत मजबूत नेटवर्क निर्माण केले. तिच्याकडे खूप मोठा क्लायंट बेस होता. ज्यात काही हाय-प्रोफाइल ग्राहकांचा समावेश होता.

यापूर्वीही कल्याणीला अनेकवेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर मुंबईतही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2005 मध्ये पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी कल्याणीवर प्रथमच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता, परंतु तिला नंतर निर्दोष सोडण्यात आले.

कल्याणीच्या जीवनावर आधारित चित्रपट?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीने तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे होत असल्याचा दावाही तिने केला होता. मात्र या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून कल्याणीला पोलिसांकडून तिचे शोषण आणि तिला वेश्याव्यवसायात कसे भाग पाडले गेले हे जगाला सांगायचे होते. कल्याणीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ती एका सामान्य कुटुंबातील आहे आणि तिचे लग्न एका ऑटोचालकाशी झाले आहे. तिच्या कुटुंबासाठी पैशाची तातडीची गरज असल्याने तिला सेक्स रॅकेटमध्ये ओढले होते. मात्र, जुलै 2016 मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यानंतर कल्याणी बिथरली. पुण्यातील भुसारी कॉलनी अपार्टमेंटमध्ये गुन्हे शाखेने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. कोथरूड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सुरुवातीला कल्याणीचे सहकारी प्रदीप गवळी आणि रवी तापसी यांना अटक केली. त्याला ऑगस्टमध्ये कठोर कलमांतर्गत अटक करण्यात आली होती.

Pune High Profile Sex Racket Kalyani Deshpande Court Order
Crime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्याकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण; फोटो लीक करण्याची धमकी देत उकळले पैसे

Next Post

चक्क ताजमहलाकडे थकीत आहे कर… तोही १ कोटींचा… मग, काय धाडली थेट नोटिस… आता काय होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
taj mahal

चक्क ताजमहलाकडे थकीत आहे कर... तोही १ कोटींचा... मग, काय धाडली थेट नोटिस... आता काय होणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011