India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चक्क ताजमहलाकडे थकीत आहे कर… तोही १ कोटींचा… मग, काय धाडली थेट नोटिस… आता काय होणार?

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महाल आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण आहे ते कर थकबाकीचं. ताज महालाला कर थकबाकीची नोटीस देण्यात आली आहे. आता याचे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक समजला जातो. पांढऱ्या शुभ्र संगमरवरानं बांधलेली यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेली ही वास्तू पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताज महालाचं सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. ताज महालाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मुघल बादशाह शाहजहान यांचं आपली पत्नी मुमताजवर प्रेम होतं. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताज महाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल 21 वर्षांचा अवधी लागला होता. अशा या जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज महाल वास्तूला पाणी आणि मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (आग्रा सर्कल) राज कुमार पटेल यांनी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या बातमीनुसार, पाण्याशी संबंधित कर सुमारे 1 कोटी रुपये आहे आणि मालमत्तेशी संबंधित कर 1.40 लाख रुपये आहे. ही थकबाकी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षाची आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आग्रा महानगरपालिकेने ताज महालसाठी पाठवलेल्या थकबाकीच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, जर 15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे एएसआय राज कुमार पटेल (ASI) म्हणतात की, स्मारकांवर मालमत्ता कर लागू होत नाही. ताज महालाचा कोणताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावर कर भरण्यास आम्ही जबाबदार नाही. हिरवळ टिकवून ठेवण्याच्या उद्देशानं येथे पाण्याचा वापर केला जातो. ताज महालासाठी पहिल्यांदाच अशी नोटीस आली आहे. याबद्दल ASI अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताज महालाला 1920 मध्ये संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलं होतं आणि ब्रिटिश राजवटीतही या स्मारकावर कोणताही कर किंवा पाणी कर लावला गेला नव्हता.

Historic Taj Mahal Tax Notice 1 Crore Rupees


Previous Post

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कल्याणी देशपांडेला न्यायालयाने दिली ही शिक्षा

Next Post

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group