India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्याकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण; फोटो लीक करण्याची धमकी देत उकळले पैसे

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. या अत्याचारांना वय, धर्म, जात, श्रीमंत, गरीब या कशाचेही बंधन नाही. काही प्रकरणात तर प्रेमसंबंध ठेवून लैंगिक शोषण करण्यासोबतच त्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. असाच काहीसा प्रकार एका शिक्षिकेसोबत घडला आहे. दक्षिण मुंबईतल्या एका शिक्षिकेनं मलबार हिल पोलीस ठाण्यात टीव्ही अभिनेता अमित अंतिलविरोधात धमकावणं, लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेनं केला. एवढेच नव्हे तर पैसे दिले नाही तर मुलाचा जीव घेण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अमित अंतिलने टेलिव्हिजनवरील काही रिॲलिटी शोज आणि गुन्हेगारी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. तक्रार दाखल करणारी शिक्षिका ही ४२ वर्षांची असून अमितने गेल्या वर्षी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर दोघं नियमितपणे एकमेकांना भेटू लागले. या भेटींदरम्यान अमितने तिच्या नकळत तिचे काही इंटिमेट फोटो काढले.

या फोटोंच्या बदल्यात त्याने आधी ९५ हजार आणि नंतर साडेपाच लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण करूनही त्याने फोटो परत केले नाहीत. उलट अजून १८ लाखांची मागणी केली. त्यानंतर मात्र महिलेनं तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आणि यावेळी जर मागणी पूर्ण केली नाही तर माझ्या मुलाचा जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-अ, ५०६, ३८४, ५०४, ४१७ अंतर्गत अमितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमित अंतिल हा मूळचा हरियाणाचा राहणारा आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप त्याची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Actor Sexual Abuse Teacher Photo Leak Threat


Previous Post

‘पुण्यात नगरसेवकाने माझ्याकडे केली होती घाणेरडी मागणी’, तेजस्विनी पंडितने सांगितला तो किस्सा

Next Post

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कल्याणी देशपांडेला न्यायालयाने दिली ही शिक्षा

Next Post

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कल्याणी देशपांडेला न्यायालयाने दिली ही शिक्षा

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group